Virat-Anushka Baby: विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा झाल्याचा पाकिस्तानात जल्लोष! मिठाई वाटून साजरा केला आनंद -Video

Virat Anushka Baby Boy Celebration In Pakistan: विराट दुसऱ्यांदा बाबा झाल्याची बातमी मिळताच सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. दरम्यान शेजारी राष्ट्रात देखील आतिषबाजी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
 virat kohli anushka sharma
virat kohli anushka sharma twitter
Published On

Virat Anushka Baby Boy Celebration In Pakistan: 

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. मंगळवारी (२० फेब्रुवारी) त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. यावेळी कोहली कुटुंबात बेबी बॉयचे आगमन झाले आहे. या मुलाचं नाव त्यांनी 'अकाय' (Akaay Meaning)ठेवलं आहे. विराट दुसऱ्यांदा बाबा झाल्याची बातमी मिळताच सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. दरम्यान शेजारी राष्ट्रात देखील आतिषबाजी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. (Akaay Name Meaning)

विराट कोहली बाबा बनताच पाकिस्तानातही जल्लोष करण्यात आला आहे. विराटच्या फॅन्सने मिठाई वाटून हा आनंदाचा क्षण साजरा केला. Lahorianz नावाच्या युट्यूब चॅनेलवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. ज्यात एक व्यक्ती विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा झाल्याच्या आनंदात मिठाई वाटताना दिसून येत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलल्याचं दिसून येत आहे. (Cricket news in marathi)

 virat kohli anushka sharma
IND vs ENG 4th Test, Team India Squad: चौथ्या कसोटीतून जसप्रीत बुमराहसह प्रमुख फलंदाज बाहेर! असा आहे संपूर्ण संघ

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती..

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने (Anushka Sharma) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुसऱ्यांदा आई - बाबा झाल्याची माहिती दिली. दोघांनी मंगळवारी ही पोस्ट शेअर केली. मात्र अकायचा जन्म १५ फेब्रुवारी रोजी झाला होता. याची माहिती त्यांनी ५ दिवसानंतर दिली आहे.

विराट कोहली भारतीय संघात करणार कमबॅक?

सध्या भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच विराटने मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेत असल्याचं कारण सांगितलं होतं. एबी डिव्हीलियर्सने विराटने माघार का घेतली यामागचं कारण सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्याने ही खोटी माहिती असल्याचं म्हटलं होतं. आता विराटने स्वतः पोस्ट शेअर करत खरं कारण सांगितलं आहे.

 virat kohli anushka sharma
Ind vs Eng: भारत-इंग्लंड कसोटीवर दहशतीचं सावट; खलिस्तानी पन्नूने दिली सामना रद्द करण्याची धमकी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com