Virat Kohli Black Water: विराट जे पाणी पितो त्या पाण्याची किंमत किती? हे पाणी पिण्याचे फायदे काय?

Virat Kohli Drinking Black Water: विराट हेच पाणी का पितो? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. तर जास्त लोड घेऊ नका, आम्ही समजावून सांगतो.
virat kohli
virat kohliyandex
Published On

Benefits Of Drinking Black Water:

>>प्रसाद जगताप

विराट कोहली 4 हजार रुपये लीटर इतक्या किमतीचं पाणी पितो. होय,तुम्ही बरोबर ऐकलं. 4 हजार रुपये लीटरचं पाणी. ज्या देशात 80 कोटीपेक्षा जास्त लोकं सरकारी रेशनवर आपलं पोट भरतात त्याच देशात विराट कोहलीसारखे सेलिब्रिटी इतकं महागडं पाणी पितात.

पण या पाण्यात नेमकं असं काय आहे? हे नक्की पाणीच आहे की समुद्रमंथनातून निघालेलं अमृत? हे पाणी इतकं महाग का आहे? विराट हेच पाणी का पितो? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. तर जास्त लोड घेऊ नका, आम्ही समजावून सांगतो. (Virat Kohli black water)

विराट जे पाणी पितो त्याला अल्कलाईन ड्रींक असं म्हणतात. हे पाणी एकटा विराटच पितो असं मुळीच नाही. विराट कोहली, मलायका अरोरा, उर्वशी रौतेला, करण जोहर, श्रुती हसन, गौरा खान आणि कितीतरी सेलिब्रिटी हेच पाणी पितात. आता इतके सगळे लोकं पाणी पितात म्हणजे नक्कीच या पाण्यात काहीतरी खास असणार.( Black water benefits)

मीडिया रिपोर्टनुसार हे पाणी 4 हजार रुपये लिटरने मिळतं. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी या पाण्याची किंमत कमी जास्त आहे. काही ठिकाणी हे पाणी 600 रुपये लिटर, तर काही ठिकाणी 900 रुपये लिटर तर काही ठिकाणी 4 हजार रुपये लिटर इतकं आहे. (Cricket news in marathi )

virat kohli
IND vs ENG 3rd Test: सरफराजचं पदार्पण होणार! या युवा खेळाडूलाही मिळणार प्लेइंग ११ मध्ये स्थान

तर विराट कोहली इव्होकस नावाचं मिनिरल वॉटर पितो,असं गुगल सांगतो. हे इव्होकस वॉटर थेट फ्रांसमधून येतं. या पाण्याच्या एका बॉटलची किंमत 600 पासून ते 4 हजार रुपयांपर्यंत इतकी आहे. आता समजा विराट 600 रुपये लिटरचं जरी पाणी पित असेल, तरी एका माणसाला दिवसाला 3 ते 5 लिटर पाणी लागतं म्हणजे दिवसाला 3 हजार आणि महिन्याला 90 हजार रुपये विराट कोहली फक्त पाण्यावर खर्च करतो. म्हणजे विराट कोहली पाण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करतो, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

virat kohli
IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी ?दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

विराट कोणतं पाणी पितो? ते कुठून येतं हे तर माहीती झालं, पण विराट हेच पाणी का पितो? हे ही जाणून घ्या. दिसायला काळकुट्ट दिसणारं हे पाणी, खुप गुणकारी आहे. हे पाणी शरीराला हायड्रेट राहायला मदत करतं. आपलं नॉर्मल नगरपालिकेच्या नळातलं जे पाणी असतं त्याची पी.एच लेव्हल 6.5 पर्यंत असते. तर ब्लॅक वॉटरची पी.एच लेव्हल डायरेक्ट 7.5 पेक्षा जास्त असते. म्हणजे जास्त नॅच्युरल पाणी.

त्यामुळेच हे पाणी आपल्या त्वचेसाठी, आपल्या आरोग्यासाठी आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेसाठी फायदेशीर ठरतं. मुख्य बाब म्हणजे या पाण्यावर कुठलीही प्रक्रिया केलेली नसते.त्यामुळेच या पाण्याची किंमत इतकी जास्त आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com