Virat Kohli: विराट दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची बातमी खोटी! विराटबाबत डिव्हिलियर्सने केला मोठा खुलासा

Ab de Villiers: विराट कोहली केव्हा परतणार? विराट कोहली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
virat kohli with ab de villiers
virat kohli with ab de villiers saam tv news
Published On

Ab de Villiers Statement On Virat Kohli:

विराट कोहली (Virat Kohli) केव्हा परतणार? विराट कोहली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विराट कोहलीचा जवळचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डीव्हिलियर्सने ( Ab de Villiers) काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की, विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे त्याने कसोटी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मात्र आता एबी डीव्हिलियर्सने याबाबत आणखी एक खुलासा केला आहे.

पाच दिवसांपू्र्वी एबी डीव्हिलियर्सने खुलासा केला होता की, विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा होणार आहे आणि त्यामुळेच त्याने कसोटी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मात्र विराट कोहलीने माघार का घेतली याचं खरं कारण समोर येऊ शकलं नव्हतं. बीसीसीआयने आपल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले होते की, विराटने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे.

विराटने मालिकेतून माघार का घेतली असावी याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. या सर्व चर्चा सुरु असताना एबी डीव्हिलियर्सने विराट दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचा बॉम्ब फोडला . मात्र आता त्याला आपली चूक समजली आहे. (Cricket news in marathi)

virat kohli with ab de villiers
IND vs ENG 3rd Test: राजकोट कसोटीपूर्वी टीम इंडियासमोर ३ मोठे प्रश्न! रोहितला उत्तर शोधणं गरजेचं

एबी डीव्हिलियर्सने दैनिक भास्करला दिलेल्या माहितीत म्हटले की, 'आधी कुटुंब मग क्रिकेट. मी यूट्युब चॅनेलवर बोलताना चूक केली होती. ती माहिती (विराट बाबा होणार) चुकीची होती.' विराट कोहलीला भारत- इंग्लंड यांच्यातील सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं.

virat kohli with ab de villiers
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी! भारत - ऑस्ट्रेलियात रंगणार अंडर -१९ WC ची फायनल

मात्र त्याने मालिका सुरु होण्यापूर्वीच माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच शेवटच्या ३ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघातूनही विराट बाहेर होऊ शकतो, असा अंदाज माध्यमातील वृत्तांमध्ये करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com