अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात घरच्या मैदानावर भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान आता भारतीय संघाकडे या पराभवाचा बदला घेण्याची संधी असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश..
अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय संघाने अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं.
गुरुवारी (८ फेब्रुवारी) या स्पर्धेतील सेमीफायनलचा दुसरा सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते. या अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर १ गडी राखून विजय मिळवला. हा सामना लो स्कोरिंग होता. मात्र शेवटच्या षटकापर्यंत गेल्याने सामन्याचा रोमांच वाढला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या १७९ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ५ चेंडू शिल्लक असताना १ गडी राखून विजय मिळवला. (Cricket news in marathi)
केव्हा, कधी अन् कुठे रंगणार फायनलचा थरार?
आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना ११ फेब्रुवारी रोजी बेनोनीच्या विलोमुर पार्कमध्ये रंगणार आहे. भारतीय संघाने नवव्यांदा या स्पर्धेची फायनल गाठली आहे. यासह भारतीय संघाकडे सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.