Under-19 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पुन्हा आमने-सामने; उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव

ICC Under-19 World Cup Aus Vs Pak: गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामना खूप रोमांचकारी झाला. उपांत्य फेरीचा सामना दमदारपणे जिंकत पाकिस्तान दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश करेल असं वाटत असताना ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या गडीने पाकिस्तानच्या स्वप्नांवर पाणी फेरलं.
ICC Under-19 World Cup  Aus Vs Pak
ICC Under-19 World Cup Aus Vs PakSaam Tv
Published On

ICC Under-19 World Cup Semi Final Aus vs Pak :

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात परत एकदा भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाची झुंज पाहायला मिळणार आहे. यावेळी अंडर१९ ची टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या संघाशी दोन हात करणार आहे. गुरुवारी झालेल्या अंडर१९ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धूळ चारलीय. उपांत्य फेरीच्या या निर्णयामुळे आस्ट्रेलिया आणि भारत पुन्हा आमने-सामने येणार आहेत. (Latest News)

गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामना खूप रोमांचकारी झाला. उपांत्य फेरीचा सामना दमदारपणे जिंकत पाकिस्तान दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश करेल असं वाटत असताना ऑस्ट्रेलियाच्या (Australia )अखेरच्या गडीने पाकिस्तानच्या (Pakistan) स्वप्नांवर पाणी फेरलं. १८० धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी झाली होती. कांगारूच्या संघाला विजयासाठी १६ धावा हव्या असताना नववा फलंदाज माघारी परतला. हा सामना पाकिस्तानच जिंकणार असं वाटतं होतं. परंतु शेवटच्या जोडीने पाकिस्तानच्या संघाचं स्वप्न भंग केलं.

दरम्यान याआधी झालेल्या पाच अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया तीनवेळा चॅम्पियन ठरलाय. आता ११ फेब्रुवारीला या वर्ल्डकपचा अंतिम सामना भारताशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉम स्ट्रेकरच्या भेदक गोलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ४८.५ षटकांत १७९ धावाच करू शकला.

टॉम स्ट्रेकरने ९.५ षटकात २४ धावा देत ६ बळी घेतले. त्याने एक ओव्हर मेडनही टाकली होती. त्याच्याशिवाय माही बियर्डमन, कॅलम विडलर, राफे मॅकमिलन आणि टॉम कॅम्पबेल यांनीही प्रत्येकी १ बळी घेतला. पाकिस्तानकडून अझान अवेस आणि अराफत मिन्हास या दोघांनी ५२-५२ धावा केल्या. या दोघांशिवाय पाकिस्तानकडून केवळ शमिल हुसेनने १७ धावा केल्या. परंतु हुसेननंतर एकही खेळाडू त्यांच्या वैयक्तिक धावांचा दुहेरी आकडा पार करू शकला नाही. पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला एकही षटकार मारता आला नाही.

ऑस्ट्रेलिया हे लक्ष्य सहज पार करेल असे वाटले होतं. हॅरी डिक्सन व सॅम कोन्स्टास यांनी ३३ धावा केल्या. पण अली रजाने सॅमला ( १४) माघारी पाठवले आणि ऑस्ट्रेलियाच्या डावाची पडझड सुरू झाली. डिक्सन व ऑलिवर पिक यांनी चांगला खेळ करून ४ बाद ५९ वरून संघाला १०२ धावांपर्यंत पोहोचवले होते. पण मिन्हासने अर्धशतकी झळकावणाऱ्या डिक्सनची विकेट घेतली आणि पुन्हा सामना दुसरीकडे पलटला.

टॉम कॅम्पबेल २५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑलिव्हर पीके वैयक्तिक ४९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर पाकिस्तानच्या अली राजाने ४ चेंडूत ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून सामन्याला रोमांचक वळणावर नेले. मात्र राफ मॅकमिलनने कॅलम विडलरसोबत शेवटच्या विकेटसाठी केलेल्या नाबाद १७ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४९.६ षटकांत ९ बाद १८१ धावांवर नेली आणि संघाला विजय मिळवून दिला.

ICC Under-19 World Cup  Aus Vs Pak
Sachin Dhas : अंडर 19 वर्ल्डकपच्या सेमीफायनलला बीडचा सचिन चमकला; सामना जिंकल्यानंतर आई-वडिलांनी सांगितली मनातली इच्छा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com