ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मँगो योर्गट हा आंबा आणि दह्याच्या मिश्रणापासून बनवलेला एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे.
ताजे पिकलेले आंबे, थंडगार दही, मध किंवा साखर, वेलची पावडर आणि चिरलेले बदाम इत्यादी साहित्य लागते.
आंबा धुवून सोलून घ्या आणि त्याचे बारिक तुकडे करुन घ्या. काही बारिक केलेले तुकडे बाजूला काढून ठेवा.
दही चांगले फेटून घ्या जेणेकरून ते मऊ आणि गुळगुळीत होईल.
आंब्याचे तुकडे दह्यात टाका आणि मध किंवा साखर घालून मिक्स करा.
चव वाढवण्यासाठी वेलची पावडर टाका आणि सगळे मिश्रण चांगले मिक्स करुन घ्या.
तयार केलेले मिश्रण सर्व्हिंग बाऊलमध्ये टाका आणि चिरलेल्या बदामांनी तसेच आंब्याच्या तुकड्यांनी सजवून घ्या.
तयार केलेले मॅंगो योर्गट थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा आणि थंडगार सर्व्ह करा.