Virat Kohli Record Saam tv news
क्रीडा

Virat Kohli Record: वानखेडेवर क्रिकेटचा इतिहास बदलणार! सचिनचा विश्वविक्रम मोडून विराट बनणार 'रेकॉर्ड किंग'

Ankush Dhavre

Virat Kohli Record, India vs Srilanka:

भारतीय संघ वानखेडेच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या सामन्यासाठी मैदानावर उतरताच विराटची नजर सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमावर असणार आहे.

हा रेकॉर्ड आहे सर्वाधिक वेळेस एकाच वर्षात १ हजार धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड. आतापर्यंत विराट आणि सचिनने प्रत्येकी ७-७ वेळेस हा कारनामा केला आहे. तर आज होणाऱ्या सामन्यात विराटकडे सचिनला मागे सोडण्याची संधी असणार आहे.

यावर्षी विराटने वनडे क्रिकेटमध्ये तुफान फटकेबाजी केली आहे. आतापर्यंत त्याने ९६६ धावा केल्या आहेत. तर वनडेत १ हजार धावा पूर्ण करण्याच्या रेकॉर्डपासून तो केवळ ३४ धावा दुर आहे.

विराटचा या स्पर्धेतील आतापर्यंतचा फॉर्म पाहिला तर, विराट या सामन्यातही मोठी खेळी करु शकतो. जर त्याने आज होणाऱ्या या सामन्यात ३४ धावा केल्या. तर वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस एकाच वर्षात १ हजार धावा पूर्ण करणारा पहिलाच फलंदाज ठरणार आहे. (Latest sports updates)

विराटने केव्हा केल्या आहेत १ हजार धावा?

२०११: ३४ सामने १३८१ धावा (४ शतक आणि १४ अर्धशतक)

२०१२: १७ सामने १०२६ धावा (५ शतक आणि ३ अर्धशतक)

२०१३: ३४ सामने १२६८ धावा(४ शतक ७ अर्धशतक)

२०१४: २१ सामने १०५४ धावा (४ शतक ५ अर्धशतक)

२०१७: २६ सामने १४६० धावा (६ शतक ७ अर्धशतक)

२०१८: १४ सामने १२०२ धावा (६ शतक ३ अर्धशतक)

२०१९: २६ सामने १३७७ (५ शतक ७ अर्धशतक)

श्रीलंकेविरुद्ध असा राहिलाय विराट कोहलीचा रेकॉर्ड

कोहलीने श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत ५२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २५०५ धावा केल्या आहेत.

यादरम्यान त्याने १० शतक आणि ११ अर्धशतक झळकावली आहेत. श्रीलंकेविरुद्ध खेळताना नाबाद १६६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. या सामन्यात त्याला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीत आतापर्यंत ४८ शतकं झळकावली आहेत. तर सचिनच्या नावे ४९ शतकं झळकावण्याची नोंद आहे. आता विराटला सचिनच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT