भारतीय संघाचा पुढील सामना येत्या २ नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरूद्ध रंगणार आहे. हा सामना मुबंईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
हा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी अतिशय खास असणार आहे. कारण यादिवशी विराटचा वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी ईडन गार्डन्स स्टेडियमवर खास तयारी केली जाणार आहे. (Virat Kohli Birthday Plan)
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानूसार, बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांनी म्हटले की,'आमची अशी इच्छा आहे की, स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांनी विराट कोहलीचा मुखवटा घालून यावं. आम्ही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ७०,००० मास्क वाटप करण्याच्या विचारात आहोत.'
विराटचा वाढदिवस होणार आणखी खास..
विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या दिवशी कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर केप कापला जाईल. विशेष लेजर शो चं आयोजन केलं जाईल. यासह मोठ्या प्रमाणावर फटाकेही फोडण्यात येतील.
विराटला मिळणार खास गिफ्ट.
या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडू विराटला विजयाचं गिफ्ट देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. (Latest sports updates)
२०२३ वर्ल्डकप स्पर्धेत अशी राहिलीये विराटची कामगिरी..
विराटने आतापर्यंत या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट सहाव्या स्थानी आहे.
त्याने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये ८८.५० च्या सरसरीने ३५४ धावा केल्या आहेत. विराट आपल्या बड्डेदिनी मोठी खेळून सचिनच्या विक्रमाची बरोबरी करु शकतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.