viral video
viral videotwitter

Viral Video: अफगाणिस्तानच्या विजयानंतर इरफानचा 'झुमे जो पठाण'! यावेळी भज्जीनेही दिली साथ;पाहा Video

Irfan Pathan -Harbhajan Singh Dance Video: या सामन्यानंतर हरभजन सिंग आणि इरफाण पठाणने भांगडा डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on

Irfan Pathan -Harbhajan Singh Dance Video:

अफगाणिस्तानने वर्ल्डकप स्पर्धेत ३ वर्ल्डकप विजेत्या संघांना धूळ चारली आहे. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आता अफगाणिस्तानने श्रीलंकेवरही विजय मिळवला आहे. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण राशिद खानसोबत डान्स करताना दिसून आला होता.

आता श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर इरफान पठाण हरभजन सिंगसोबत डान्स करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अफगाणिस्तान क्रिकेटला पुढे नेण्यात भारताचा मोलाचा वाटा आहे. भारतीय दिग्गज खेळाडू अजय जडेजा अफगाणिस्तानसाठी मेंटॉरची भूमिका पार पाडतोय. अजय जडेजाने असं काहीतरी करून दाखवलं आहे, जे यापूर्वी कोणालाच करता आलं नव्हतं. दरम्यान या विजयानंतर इरफान पठाण आणि हरभजन सिंग जल्लोष साजरा करताना दिसून आले आहेत.

इरफान आणि हरभजनने केला भांगडा..

इरफान पठाण आणि हरभजन सिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्य दोघेही माजी क्रिकेटपटू भांगडा डान्स करताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये राशिद खान दिसून येत नाहीये.

मात्र स्टुडिओमध्ये केलेल्या या भन्नाट डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या विजयासह अफगाणिस्तानची वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता आणखी वाढली आहे. (Latest sports updates)

अफगाणिस्तानचा जोरदार विजय..

हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात श्रीलंकेचा डाव २४१ धावांवर संपुष्टात आला. अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २४२ धावांची गरज होती. हे आव्हान अफगाणिस्तानने २८ चेंडू शिल्लक ठेवून ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

viral video
IND vs ENG: बॉल ऑफ द वर्ल्डकप! कुलदीपनं शेन वॉर्न सारखाच बॉल फिरवत घेतली बटलरची विकेट; पाहा Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com