Virat Kohli World Record
Virat Kohli World RecordSAAM TV

Virat Kohli World Record : विराट कोहली ५० वे शतक कधी ठोकणार? महान क्रिकेटपटूनं तारीख, मैदान आणि संघही सांगितला

Virat Kohli Record : विराट कोहली शतकांचं अर्धशतक कधी साजरं करणार? याबाबत महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भविष्यवाणी केली आहे.
Published on

Virat Kohli 50th ODI century :

टीम इंडियाची 'रन मशीन' विराट कोहली वर्ल्डकप स्पर्धेत खोऱ्यानं धावा ओढतोय. आतापर्यंतच्या पाच सामन्यांत एक शतकही ठोकलं आहे. विराटची वनडे क्रिकेटमध्ये ४८ शतके आहेत. शतकांची 'फिफ्टी' करण्यापासून तो फक्त दोन पावले दूर आहे. आता शतकांचं अर्धशतक कधी साजरं करणार? याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे. याबाबत महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भविष्यवाणी केली आहे.

विराट कोहलीनं वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४८ शतके केली आहेत. सध्याचा त्याचा फॉर्म बघता शतकांचे अर्धशतक लवकरच पूर्ण करेल, असा विश्वास कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना आहे. पण शतकांची ही फिफ्टी कधी, कुठे आणि कोणत्या संघाविरोधात करेल, याबाबत भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भविष्यवाणी केली आहे.

विराट कोहली ५० वे वनडे शतक दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात करेल. आपल्या वाढदिवशी ही कामगिरी केल्यास यापेक्षा चांगला क्षण काय असू शकतो, असं गावसकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले. जेव्हा तिथं शतक करशील तेव्हा तुला स्टँडिंग ओवेशन मिळेल. फॅन्स चीअर करतील. प्रत्येक खेळाडूसाठी स्वतःला सिद्ध करण्याची सोनेरी संधी असते, असंही गावसकर कोहलीला उद्देशून म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्ल्डकपमध्ये विराट कामगिरी

विराट कोहलीने आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांत एकूण ३५४ धावा केल्या आहेत. त्याच्या धावांची सरासरी ११८ इतकी आहे. बांगलादेशविरुद्ध त्याने शतक तडकावलं होतं. न्यूझीलंडविरुद्ध तो शतकाच्या जवळपास पोहोचला असतानाच बाद झाला.

या स्पर्धेत त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ धावा, अफगाणिस्तानविरुद्ध ५५, पाकिस्तानविरुद्ध १६ धावा, बांगलादेशविरुद्ध १०३ धावा आणि न्यूझीलंडविरुद्ध ९५ धावा केल्या आहेत. भारताचा पुढील सामना २९ ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. विराट या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

Virat Kohli World Record
Hardik Pandya injury status : टीम इंडियाचं टेन्शन दुपटीनं वाढलं; हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत 'गंभीर' माहिती

सचिनचा विक्रम मोडणार...

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. सचिनच्या नावावर ४९ शतके आहेत. विराट कोहलीची ४८ शतके आहेत. एक शतक करताच, विराट कोहली सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करेल. तर ५० वे शतक करताच, क्रिकेटचा देव सचिनचा विक्रम तो मोडीत काढेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विराट सचिनच्या खूपच मागे आहे.

Virat Kohli World Record
World Cup : भारत-इंग्लंड सामन्याआधी धक्कादायक वृत्त; स्टार खेळाडूच्या त्या फोटोनं टेन्शन वाढवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com