Hardik Pandya injury status : टीम इंडियाचं टेन्शन दुपटीनं वाढलं; हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत 'गंभीर' माहिती

hardik pandya ligament tear injury latest update : 'वर्ल्डकप स्पर्धा २०२३' ऐन मध्यावर आलेली असतानाच टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
hardik pandya ligament injury
hardik pandya ligament injurySAAM TV
Published On

hardik pandya ligament tear injury latest update :

'वर्ल्डकप स्पर्धा २०२३' ऐन मध्यावर आलेली असतानाच टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. संघातील महत्वाचा खेळाडू आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्याच्या पायाला झालेल्या दुखापतीबाबत 'गंभीर' माहिती समोर आली आहे.

टीम इंडियानं (Team India) वर्ल्डकपची सुरुवात धमाकेदार केली आहे. सुरुवातीचे पाच सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. या पाच सामन्यांपैकी ३ सामन्यांत विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या संघांना धूळ चारली आहे.

(सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

टीम इंडियाची ही विजयी मालिका पुढेही सुरूच राहील असं वाटत असतानाच, मधल्या फळीतला ऑलराउंडर हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) पायाला दुखापत झाली आणि तो सध्या संघाबाहेर आहे. आता टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी आली आहे. हार्दिक पुढील अनेक सामने खेळू शकत नाही, असं सांगितलं जात आहे. (Latest News)

हार्दिकच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. ग्रेड १ लिगामेंट सरकल्याची शक्यता असल्याने तो पुढचे काही सामने खेळू शकणार नाही, असं वृत्त आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हार्दिकच्या संदर्भात टीम इंडिया व्यवस्थापन कोणतीही जोखीम घेण्याच्या मनस्थितीत नाही. अशात तो पुढचे काही सामने खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. वर्ल्डकपमधील उर्वरित सामने खेळण्यासंदर्भातील निर्णय पुढच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.

hardik pandya ligament injury
Amol Muzumdar: भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रशिक्षक म्हणून मिळाला 'दुसरा सचिन'; पदार्पणातच कुटल्या होत्या २६० धावा

कुणाला संधी मिळणार?

हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडच्या विरोधात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळाली होती. तर मोहम्मद शमीचाही समावेश करण्यात आला होता.

शमीने पहिल्याच सामन्यात मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि पाच गडी बाद केले. लखनऊमध्ये पुढचा सामना होतोय. तेथील खेळपट्टी मध्यमगतीच्या गोलंदाजांना मदतगार ठरू शकते. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विनला संधी मिळू शकते. असं झाल्यास टीम इंडियाचा फलंदाजी क्रम आणखी मजबूत होणार आहे. अश्विन आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

hardik pandya ligament injury
AUS vs NED: दिल्लीत डेव्हिड वॉर्नरचं रेकॉर्ड ब्रेकिंग शतक! मोठ्या विक्रमात क्रिकेटच्या देवालाही सोडलं मागे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com