दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात वर्ल्ड कपचा २४ वा सामना झाला. या सामन्यात नेदरलँड्सच्या संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने नेदरलँड्ससमोर तब्बल ४०० धावांचं आव्हान ठेवलं होतं. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर याने डबल धमाका केला. वॉर्नरने आपल्या अखेरच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरं शतक झळकावलं. या शतकासह त्याने सचिनचा रेकॉर्ड तोडला केला. काय होता सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड? (Latest News)
वॉर्नरने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननंतर नेदरलँड्सच्या संघाविरुद्ध जोरदार बॅटिंग करत शतक ठोकलं. वॉर्नरने शतक पूर्ण करण्यासाठी ९१ चेंडू खेळले. वॉर्नरच्या वनडे कारकीर्दीतील हे २२ वे शतक ठरलं. त्याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकरचा एक विक्रम तोडला. तो म्हणजे शतक करण्याचा. आता तुम्ही म्हणाल सचिनने तर अनेक शतकं केली. मग विक्रम कसा तुटला. असं वाटतं असेल तर थांबा. कारण या २२ शतकं करण्याठी डेव्हिड वॉर्नरने फक्त २३ डाव खेळले आहेत. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)
आज दिल्लीच्या मैदानात झालेल्या नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात डेव्हिडने ९१ चेंडूत शतकं केलं. यासाठी त्याने तब्बल ११ चौकार आणि ३ षटकार मारलेत. यादरम्यान त्याचा ११३.१९ चा स्ट्राईक रेट होता. वॉर्नर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करणारा दुसरा आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज ठरला. वनडे वर्ल्ड कपमध्ये वेगवान ६ शतकं झळकावत सचिनचा विक्रम तोडलाय. वॉर्नरने अवघ्या २३ डावात ६ शतकं केली आहेत. तर सचिनला इतकीच शतकं करण्यासाठी ४४ डाव खेळावे लागले होते. दरम्यान वॉर्नरचं वर्ल्ड कपमधील हे सलग दुसरं शतक आहे.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ८ गडी गमावत ३९९ धावा केल्या आणि नेदरलँडच्या क्रिकेट संघाला ४०० धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी नेदरलँडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. मॅक्सवेलने ४० चेंडूत सर्वात जलद शतक केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.