World Cup 2023 AUS vs NED: मॅक्सवेलची 'मॅक्स'खेळी; नेदरलँडच्या संघासमोर ४०० धावांचे आव्हान

Cricket World Cup 2023 : दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँडच्या संघात क्रिकेट वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील २४ वा सामना होत आहे.
Cricket  World Cup 2023
Cricket World Cup 2023Saam Tv
Published On

World Cup 2023 AUS vs NED:

क्रिकेट वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील २४ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँडच्या संघात होत आहे. दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात आधी खराब राहिली. परंतु ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेलच्या मॅक्स खेळीमुळे ऑस्ट्रेलियाना नेदरलँडच्या संघासमोर धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३९९ धावा केल्या.(Latest News)

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने विश्वविक्रमी खेळी केली आहे. मॅक्सवेलने केवळ ४० चेंडूत वादळी शतक ठोकलं. या खेळीत त्याने ४४ चेंडूच्या खेळीत ९ चौकार आणि ८ षटकार ठोकून विश्वविक्रम केला. तर ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाज डेविड वॉर्नरने शतक केलं. त्याने ९३ चेंडूत १०४ धावा केल्या. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

वॉरनरने ३ षटकार आणि ११ चौकारासह यंदाच्या वर्ल्डकपमधील विक्रमी दुसरे शतक ठोकलं. तर वर्ल्डकपच्या करिअरमधील हे ६ वं शतक केलं. मॅक्सवेलची वादळी खेळी आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नेदरलँडविरुद्ध ५० षटकात ८ बाद ३९९ धावांपर्यंत मजल मारली.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या फटकेबाजीसमोर नेदरलँड्सचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ झालेले दिसले. तर नेदरलँड्सकडून लोगान वॅन बीक या गोलंदाजाने ४ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला लगाम घालण्याचा प्रयत्न केला. पण इतर गोलंदाजांनी जोरदार मार खाल्ला.

Cricket  World Cup 2023
Team India Playing 11 : टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार?; धडाकेबाज फलंदाज, खतरनाक गोलंदाजाची होणार एन्ट्री

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com