Vaibhav Suryavanshi  x
Sports

टीम इंडियासह वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर जाणार, चेन्नई सुपर किंग्सच्या 'या' खेळाडूलाही मिळू शकते संधी

India England Tour : आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याच सुमारास भारताची अंडर-१९ टीम सुद्धा इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

IPL 2025 संपल्यानंतर लगेच जून महिन्यामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होईल. यासाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना होणार आहे. याच सुमारास भारताची अंडर-१९ टीम सुद्धा इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही टीम इंग्लंडमध्ये ५ एकदिवसीय तर २ कसोटी सामने खेळेल.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून पासून भारताची ए टीम इंग्लंडला पोहोचेल. याच दरम्यान भारतीय महिला क्रिकेट टीम आणि भारतीय मिक्स डिसेबल टीम सुद्धा इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. तेव्हाच अंडर-१९ क्रिकेटचा टीम देखील यूकेला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अंडर-१९ टीममध्ये आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना संधी मिळेल असे म्हटले जात आहे.

इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या अंडर-१९ टीममध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज आयुष म्हात्रेला स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये पदार्पणातच दमदार खेळी करुन क्रिकेटप्रेमींना खुश केले आहे. वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूत १०० धावा करत ऐतिहासिक कामगिरी केली. चेन्नईकडून खेळताना मुंबई विरुद्धच्या सामन्यात म्हात्रेने ३२ धावा केल्या होत्या. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळताना ३० धावा केल्या होत्या.

वैभव सूर्यवंशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या अंडर-१९ टीममध्ये समाविष्ट होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकही केले होते. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे हे अंडर-१९ आशिया कपमध्येही एकत्र खेळले होते. दोघे टीम इंडियाचे सलामीवीर होते. त्या स्पर्धेत वैभव आणि आयुष यांनी आयपीएलप्रमाणे चांगली कामगिरी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT