
RR VS GT : वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यामध्ये इतिहास रचला. वयवर्ष १४ असणाऱ्या वैभवने ३५ चेंडूंमध्ये १०० धावा करत अनेक विक्रम मोडत काढले. प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा अशा गुजरातच्या इनफॉर्म गोलंदाजांची वैभवने सहज धुलाई केली. त्यातही त्याने गुजरातकडून पदार्पण करणाऱ्या अफगाणी गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये तब्बल ३० धावा केल्या.
करीम जनत या अफगाणी गोलंदाज काल (२८ एप्रिल) झालेल्या राजस्थान विरुद्ध गुजरात सामन्यामधून आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण केले. पण पदार्पणाच्या सामन्यातच त्याने एका ओव्हरमध्ये ३० धावा दिल्या. ३०.०० अशी करीम जनतची या सामन्यातली इकॉनमी होती. वैभव सूर्यवंशीने त्याची इतकी धुलाई केली, की त्याला सामन्यात पुन्हा गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
दहाव्या ओव्हरमध्ये करीम जनत गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवर लेग साईडच्या दिशेने वैभवने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर डिप स्क्वेअर लेगला जोरदार षटकार ठोकला. नंतर चौथ्या चेंडूवर ऑफसाईडच्या दिशेने चौकार मारला. पाचव्या चेंडूच्या वेळेस फुलटॉस चेंडूवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेने षटकार मारला. एका ओव्हरमध्ये तब्बल ३० धावा करणारा तरुण भारतीय अशा विक्रमाची नोंद वैभव सूर्यवंशीच्या नावावर झाली आहे.
याव्यतिरिक्त वैभव सूर्यवंशीने इतर अनेक रेकॉर्डही मोडले आहेत. ११ षटकार आणि ७ चौकार मारत ३८ चेंडूंमध्ये त्याने १०१ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणाऱ्या भारतीयांच्या यादीत तो प्रथम स्थानी आहे. याशिवाय आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकणारा खेळाडूही वैभव सूर्यवंशी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.