Shahid Afridi : भारताविरुद्ध गरळ ओकली, तरीही सरकारने शाहिद आफ्रिदीच्या यूट्यूब चॅनलवर बंदी का नाही घातली?

India Digital Strike on Pakistan : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केली आहे. केंद्र सरकारने १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे.
Shahid Afridi
Shahid AfridiX
Published On

Shahid Afridi : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. हा भ्याड हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा गटाचा भाग असलेल्या रेझिस्टन्स फ्रन्टने केल्याचे म्हटले जात आहे. हल्ल्यानंतर लगेचच भारताने पाकिस्तानविरोधी कारवाई केली. सिंधू जल करारापासून कारवाईची सुरुवात झाली. आता भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक केली आहे. सरकारने १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे.

भारतीय सरकारद्वारे बॅन करण्यात आलेल्या पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्समध्ये ४ पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या यूट्यूब चॅनल्सचा समावेश देखील आहे. शोएब अख्तर, बासित अली, राशिद लतीफ आणि तनवीर अहमद यांना भारताच्या डिजिटल स्ट्राइकचा फटका बसला आहे. पण बॅन करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनल्समध्ये शाहिद आफ्रिदीच्या यूट्यूब चॅनलचा समावेश नाहीये. त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. आफ्रिदीच्या यूट्यूब चॅलनवर १.२२ मिलियन सब्सक्रायबर्स आहेत.

Shahid Afridi
भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक, शोएब अख्तरसह १६ YouTube चॅनेल्सवर बंदी

काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्लाला शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्याला जबाबदार धरले आहे. 'जर भारतात एखादा फटाका फुटला, तरी ते लोक पाकिस्तानला दोष देतात. काश्मीरमध्ये भारताची ८ लाखांचे सैन्य आहे, तरीही असे घडले. तुम्ही नागरिकांना सुरक्षा देऊ शकत नसाल, तर तुम्हीच नालायक, बिनकामाचे आहात,' असे वक्तव्य शाहिद आफ्रिदीने केले होते.

Shahid Afridi
Pahalgam Attack : उठसूट आमच्याकडे बोट का दाखवता? पुरावा काय? शाहिद आफ्रिदीने भारताला केला सवाल

'हल्ला झाला आणि लगेचच त्यांनी (भारत सरकारने) हल्ल्यासाठी पाकिस्तानला कारणीभूत मानले. हा हल्ला जर पाकिस्तानने केला तर त्याचा पुरावा सादर करा. कोणताही पुरावा न देता त्यांनी पाकिस्तानवर आरोप केले आहेत', असेही शाहिद आफ्रिदी म्हणाला होता. अशा प्रकारे भारत विरोधी वक्तव्य करणाऱ्या शाहिद आफ्रिदीच्या यूट्यूब चॅलनवर बंदी का घातली नाही असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

Shahid Afridi
'..तुम्ही नालायक, बिनकामाचे आहात'; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, पहलगाम हल्ल्यावरुन भारतीय सैन्यावर केली टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com