भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक, शोएब अख्तरसह १६ YouTube चॅनेल्सवर बंदी

India digital action Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध डिजिटल स्ट्राईक केला आहे. शोएब अख्तरच्या '100mph' चॅनेलसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiANI
Published On

India bans Pakistani YouTube channels : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर आणखी एक कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. यामध्ये Dawn News, Samaa TV, ARY News, Geo News यांसारख्या प्रमुख माध्यम समूहांसह माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्या '100mph' या यूट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानमधील या यूट्यूब चॅनेल्सवर भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरुद्ध खोटे आणि दिशाभूल करणारी माहिती, चिथावणीखोर आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील कॉन्टेट दिला जात असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. पहलगाममधील हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता. या हल्ल्याला 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या दहशतवादी गटाने जबाबदार धरले होते. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमधील 'लष्कर-ए-तैय्यबा'शी संबंधित आहे. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला होता. आता भारताने केलेल्या डिजिटल स्ट्राईकमुळे पाकिस्तानची आणखी आर्थिक कोंडी होणार आहे.

Dawn News, Samaa TV, ARY News, Geo News
Dawn News, Samaa TV, ARY News, Geo NewsANI

पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातल्याचे भारतामधील नेटकऱ्यांनी स्वागत केलेय. X वर काही युजर्सनी या कारवाईला 'डिजिटल स्ट्राइक' म्हटलेय. तर काहींनी याला पाकिस्तानविरुद्ध भारताची आक्रमक पवित्रा असल्याचे सांगितलेय. काही नेटकऱ्यांच्या मते पाकिस्तानची आर्थिक कोंडी होईल. यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातलेल्यांमध्ये शोएब अख्तरसह, आरझू काझमी, सय्यद मुजम्मिल आणि फुरकान भट्टी यांच्या चॅनेल्सचा समावेश आहे.

PM Narendra Modi
Pahalgam Attack : विषय संपवा, अमेरिकेकडून भारत आणि पाकिस्तानला सूचना

शोएब अख्तरच्या चॅनेलवर बंदी

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्या '100mph' या यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. या चॅनेलवर क्रिकेटशी संबंधित सामग्रीसह भारताविरुद्ध कथितपणे आक्षेपार्ह टिप्पण्या आणि चुकीची माहिती प्रसारित केली जात असल्याचा आरोप आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

PM Narendra Modi
Pakistan: कंगाल पाकिस्तानने चीनपुढे हात पसरले, १.४ बिलियन डॉलर कर्ज मागितले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com