US on India Pakistan conflict : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलाय. दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे २६ पर्यटकांचा जीव गेला होता. यामुळे भारताकडून कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली. सिंधू करारासह ५ ठोस पावले उचलत पाकिस्तानला कोंडीत पकडले होते. पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तर देण्याच्या पोकळ धमक्या दिल्या जाऊ लागल्या. दोन्ही देशातील वाढता तणाव पाहाता अमेरिकेने मध्यस्थितीची भूमिका घेतली आहे. अमेरिकेकडून दोन्ही देशांना तोडगा काढण्याच्या सूचना करम्यात आल्या आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील तणावाच्या परिस्थितीवर अमेरिका लक्ष ठेवून आहे.
पहलगाममधील बैसारन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता.या हल्ल्याची जबाबदारी 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या दहशतवादी संघटनेने घेतली. ही संघटना पाकिस्तानमधील 'लष्कर-ए-तैय्यबा' (LeT) या दहशतवादी संघटनेचा सहकारी गट मानला जातो. पर्यटकांना लक्ष्य करण्यात आल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. भारताकडून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. तोडगा काढण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परिस्थिती सतत बदलत आहे आणि आम्ही यावर बारीक नजर ठेवून आहोत. आम्ही भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांशी अनेक स्तरांवर संपर्कात आहोत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त प्रसारित केलेय. अमेरिका भारत आणि पाकिस्तान यांना योग्य तो तोडगा काढण्यासाठी आणि एकत्र काम करण्यास प्रोत्साहित करत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहोत. आमचा भारताला पाठिंबा असेल, असेही त्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, पहलगाम हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC), रशिया, इस्रायल आणि तालिबान-नियंत्रित अफगाणिस्तान सरकारसह अनेक देशांनी निषेध केला आहे. UNSC नेही संतप्त प्रतिक्रिया दिली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला. भारताने पाकिस्तानवर क्रॉस-बॉर्डर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप करत कठोर पावले उचलली आहेत. १९६० चा सिंधू जल करार निलंबित करणे, अटारी इंटिग्रेटेड चेकपोस्ट बंद करणे आणि पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या व्हिसा सेवा तात्काळ बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला. पाकिस्तानकडून याला प्रत्युत्तर देण्यात आले. पाकिस्तानने १९७२ चा शिमला करार आणि इतर द्विपक्षीय करार निलंबित केले आहेत. भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.