Bhosale Sword Auction : भोसले घराण्याची तलवार विक्रीला, इंग्लंडच्या कंपनीकडून ऑनलाइन लिलाव

Nagpur Bhosale sword auction : नागपूरच्या भोसले घराण्याची श्रीमंत रघुजी महाराज भोसले प्रथम यांची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय लिलावासाठी उपलब्ध झाली आहे. इंग्लंडमध्ये पोहोचलेल्या या तलवारीच्या प्रवासाचा उलगडा जाणून घ्या.
historic sword of Raghoji Maharaj
historic sword of Raghoji Maharaj
Published On

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur Bhosale sword auction, historic sword of Raghoji Maharaj : नागपूरमधील भोसले घरण्याची ऐतिहासिक तलवार चक्क आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाइन विक्रीला काढण्यात आली आहे. श्रीमंत राजे रङुजी महाराज भोसले (प्रथम) यांच्या ऐतिहासिक तलवारीचा लिलाव होणार आहे. दरम्यान, नागपूरकर भोसले घराण्याची तलवार कंपनीपर्यंत इंग्लंडला कशी गेली? असा प्रश्न नागपूरकर, पत्रकार, इथिहासाकर, इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींना पडला आहे.

न्यूयॉर्कचे एक ब्रोकर कंपनीने तलवारीचा लिलावात ठेवला आहे, नागपूरचे संस्थापक श्रीमंत रघुजी महाराज भोसले प्रथम यांची तलवार असल्याचा दावा विक्रीच्या जाहिरातीत कंपनीकडून करण्यात आला आहे. १८५३ ते १८६४ या कालावधीत श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले, दुसरे (उर्फ आप्पासाहेब महाराज) यांच्या नेतृत्वात मराठा विरुद्ध ब्रिटिश युद्ध झाले होते. या कालावधीत ब्रिटिशांनी नागपुरात खजिना लुटल होता, त्यामध्ये कदाचित ही तलवार गेली असावी अशी शक्यता आहे. मात्र ही तलवार विक्री करणाऱ्या कंपनीकडे कशी गेली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

historic sword of Raghoji Maharaj
Bhandara Accident: भंडाऱ्यात भीषण अपघात, भरधाव कार ट्रकवर आदळली, ४ जणांचा जागीच मृत्यू

Sotheby's ही ब्रिटिशांची मल्टिनॅशनल कंपनी असून त्याचे मुख्यालय न्यूयॉर्कला आहे. कंपनीत सात हजार ग्रेट ब्रिटन पाउंडमध्ये लिलाव होणार अशी चर्चा आहे. या लिलावामुळे इतिहासकार, पत्रकार, शिवप्रेमी आणि सामान्य जनतेत उत्सुकता आणि प्रश्नांचा काहूर निर्माण झाला आहे. ही तलवार इंग्लंडपर्यंत कशी पोहोचली, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. १८५३ ते १८६४ या कालावधीत झालेल्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी नागपूरच्या भोसले राजघराण्याचा खजिना लुटला होता. यात रत्नजडित दागिने, शस्त्रसाठा आणि तलवारींचा समावेश होता. कदाचित याच लुटीदरम्यान ही तलवार इंग्लंडला गेली असावी, अशी एक शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी की, एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही तलवार गुप्तपणे नेली आणि कालांतराने ती विकली किंवा कोणाला भेट दिली असावी.

historic sword of Raghoji Maharaj
Earthquake : पालघर भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com