१४ वर्षाच्या वैभवची कमाल; धुरंदर गोलंदाजांना नमवलं, शानदार शतक झळकावलं, 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Vaibhav Suryavanshi Century : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये इतिहास रचला आहे. त्याने गुजरात विरुद्ध खेळताना दमदार शतक ठोकले आहे. यासोबतच त्याने अनेक विक्रम मोडले आहेत.
Vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi X
Published On

RR VS GT IPL 2025 : सवाई मानसिंग स्टेडियमवर आज १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला आहे. त्याने गुजरात टायटन्सच्या विरुद्ध खेळताना ३५ चेंडूंवर १०० धावा केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद आणि कमी चेंडूंमध्ये शतकीय कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी हा पहिला भारतीय बनला आहे. याआधी हा विक्रम यूसूफ पठाणच्या नावावर होता.

वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू आहे. त्याने आजच्या सामन्यामध्ये शतकीय कामगिरी करत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. सर्वात कमी वयामध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये १०० धावा करणारा वैभव हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. करीम जनतच्या दहाव्या ओव्हरमध्ये वैभवने ६, ४, ६, ४, ४, ६ अशा प्रकारे ३० धावा केल्या. त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये वैभवने त्याचे आयपीएलमधले पहिले शतक पूर्ण केले.

Vaibhav Suryavanshi
Shahid Afridi : भारताविरुद्ध गरळ ओकली, तरीही सरकारने शाहिद आफ्रिदीच्या यूट्यूब चॅनलवर बंदी का नाही घातली?

आयपीएल इतिहासातील सर्वात जलद शतके:

३० चेंडू – ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, २०१३)

३५ चेंडू – वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, २०२५)

३७ चेंडू – युसूफ पठाण (राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१०)

टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक करणारे खेळाडू:

१४ वर्षे ३२ दिवस – वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, २०२५)

१८ वर्षे ११८ दिवस – विजय झोल (महाराष्ट्र विरुद्ध मुंबई, २०१३)

१८ वर्षे १७९ दिवस – परवेझ हुसैन इमॉन (बारिशाल विरुद्ध राजशाही, २०२०)

आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक करणारे खेळाडू:

१४ वर्षे ३२ दिवस – वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, २०२५)

१९ वर्षे २५३ दिवस – मनिष पांडे (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध डेक्कन चार्जर्स, २००९)

२० वर्षे २१८ दिवस – रिषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१८)

Vaibhav Suryavanshi
IPL मधली सर्वात मोठी बातमी! सामन्यांची संख्या वाढणार, ७४ नाहीतर आता ९४ सामने होणार; कारण आलं समोर

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग ११ -

यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिमरॉन हिटमायर, जोफ्रा आर्चर, वनिंदू हसरंगा, संदीप शर्मा, महेश तिक्षणा, युधवीर सिंह

शुभम दुबे, तुषार देशपांडे, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, कुणाल राठोड

गुजरात टायटन्सची प्लेईंग ११ -

साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर शाहरुख खान, राहुल तेवतिया, करीम जनत, राशिद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

इशांत शर्मा, महिपाल लोमरोर, अनुज रावत, अरशद खान, दशुन शनाका

Vaibhav Suryavanshi
KL Rahul Sanjiv Goenka : केएल राहुल-संजीव गोएंका यांच्यात काय घडलं? एका वर्षानंतर वादावरचा पडदा सरकला; खेळाडूनंच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com