IPL मधली सर्वात मोठी बातमी! सामन्यांची संख्या वाढणार, ७४ नाहीतर आता ९४ सामने होणार; कारण आलं समोर

IPL News : सध्या आयपीएलच्या अठराव्या सीझनची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. सीझनमधील ४६ सामने पूर्ण झाले आहेत. याच दरम्यान आयपीएलशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
IPL News
IPL NewsX
Published On

IPL Latest News : भारतासह जगभरात आयपीएलची धुमधाम पाहायला मिळत आहे. इंडियन प्रीमियर लीग ही सध्या जगातील सर्वात मोठ्या लीग्सपैकी एक आहे. यंदा आयपीएलचे अठरावे वर्ष आहे. आतापर्यंत आयपीएल २०२५ मध्ये ४६ सामने खेळले गेले आहेत. अशातच या स्पर्धेशी निगडीत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. आयपीएलचे चेअरमॅन अरुण धूमल यांनी ही क्रिकेट लीग आणखी वरच्या स्तरावर नेण्याची तयारी सुरु केली आहे. बीसीसीआय लवकरच आयपीएलमध्ये मोठा बदल करणार आहे.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय २०२८ मध्ये आयपीएलच्या सामन्यांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. आयपीएल २०२५ मध्ये एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहे. तर २०२८ मध्ये आयपीएलच्या सीझनमध्ये एकूण ९४ सामने खेळवले जाऊ शकतील. लीगमध्ये नवीन फ्रँचायझी आणण्याचा सध्यातरी बीसीसीआयचा प्लान नाहीये. आयपीएल २०२५ मध्ये ८४ सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न होता. पण वेळापत्रकामुळे ते करणे शक्य झाले नाही.

IPL News
Shahid Afridi : भारताविरुद्ध गरळ ओकली, तरीही सरकारने शाहिद आफ्रिदीच्या यूट्यूब चॅनलवर बंदी का नाही घातली?

'बीसीसीआय २०२८ मध्ये सुरु होणाऱ्या मीडिया-राइट्स सायकलपासून ९४ सामन्यांच्या फॉरमॅटपर्यंत विस्तार करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. याबद्दल आम्ही आयसीसीशी, बीसीसीआयशी चर्चा करत आहोत. द्विपक्षीय मालिका आणि आयसीसी स्पर्धा, फ्रँचायझी क्रिकेट आणि टी-२० क्रिकेट यांच्या बाबतीत चाहत्यांमध्ये ज्या पद्धतीने रस बदलत आहे ते पाहता, आपण याबद्दल अधिक गांभीर्याने बोलले पाहिजे', असे अरुण धूमल यांनी क्रिकबझला सांगितले.

IPL News
KL Rahul Sanjiv Goenka : केएल राहुल-संजीव गोएंका यांच्यात काय घडलं? एका वर्षानंतर वादावरचा पडदा सरकला; खेळाडूनंच...

'प्रत्येक संघाला घरच्या मैदानावर आणि बाहेरच्या मैदानावर प्रत्येक संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळावी यासाठी ९४ सामने आवश्यक आहेत. त्यानुसार आम्ही वेळापत्रक तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या लीगमध्ये दहा संघ पुरेसे आहेत', असे वक्तव्य आयपीएलचे चेअरमन अरुण धूमल यांनी केले आहे.

IPL News
एका धावेची किंमत २४ लाख; पण सामन्यात असं काही होतंय की शेवटी रिषभचा खिसा रिकामाच, प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com