वैभवला कोणत्या गोलंदाजाची भीती वाटते? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, 'मी अशा...'

Vaibhav Suryavanshi IPL 2025 : वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात ३५ चेंडूत १०० धावा करत ऐतिहासिक कामगिरी केली. अनेक विक्रम रचणाऱ्या वैभवचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Vaibhav Suryavanshi IPL 2025
Vaibhav Suryavanshi IPL 2025X
Published On

RR VS GT IPL 2025 : राजस्थान विरुद्ध गुजरात सामन्याच्या दुसऱ्या डावापासून सर्वत्र फक्त वैभव सूर्यवंशीचे नाव ऐकायला मिळत आहे. १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये पदार्पणानंतर लगेचच तिसऱ्या सामन्यात शतकीय खेळी केली. आयपीएल इतिहासात एका भारतीयाने केलेले हे सर्वात जलद शतक होते. त्याने २६५.७९ च्या स्ट्राईक रेटने ३० चेंडूत १०१ धावा केल्या. यात ७ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता.

गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेत वैभव सूर्यवंशीने क्रिकेटजगतात ठसा उमटवला. त्याने अनेक विक्रम मोडत इतिहास रचला. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांच्यासह अनेक क्रिकेट विश्वातील दिग्गज वैभवचे चाहते बनले आहेत. सामना संपल्यानंतर वैभवला प्लेयर ऑफ द मॅचच्या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. प्लेयर ऑफ द मॅच जिंकणारा वैभव हा आयपीएलमधला सर्वात तरुण खेळाडू आहे.

Vaibhav Suryavanshi IPL 2025
६, ४, ६, ४, ४, ६... १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने गुजरातकडून IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या अफगाणी गोलंदाजाला धू धू धुतला

वैभव सूर्यवंशीला सामना संपल्यानंतर 'तुला कसली भीती आहे का? तु कुणाला घाबरतोस का? (एका प्रकारे, कोणत्या गोलंदाजाला घाबरतोस का?)' असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा वैभव म्हणाला, नाही असं काही नाहीये. मी अशा गोष्टींवर जास्त विचार करत नाही. मी फक्त खेळण्यावर लक्ष केंद्रित करतो. वैभवने त्याच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात एका दमदार षटकाराने केली होती.

Vaibhav Suryavanshi IPL 2025
१४ वर्षाच्या वैभवची कमाल; धुरंदर गोलंदाजांना नमवलं, शानदार शतक झळकावलं, 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

'आयपीएलमध्ये शतक करणे हे स्वप्नवत आहे. हे जे घडतंय ते खूपच छान आह. आयपीएलच्या माझ्या तिसऱ्या सामन्यातील हे माझे पहिले शतक आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून मी करत असलेल्या सरावाचे परिणाम दिसून येत आहेत. मी मैदानावर लक्ष न देता फक्त चेंडूवर लक्ष केंद्रित करतो. यशस्वी जयस्वालसोबत फलंदाजी करताना मला आत्मविश्वास मिळतो. तो मैदानात खूपच सकारात्मक असतो', असे वक्तव्य वैभव सूर्यवंशीने केले.

Vaibhav Suryavanshi IPL 2025
Vaibhav Suryavanshi : घरातील प्रत्येक जण फक्त वैभवसाठी जगतो, १४ वर्षांच्या शतकवीर सूर्यवंशीची संघर्षकहाणी!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com