Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

Jay Pawar Cancels Press Conference Over VSR company : VSR कंपनीबद्दल जय पवार मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसात रंगली होती. अशातच जय पवारांनी पत्रकार परिषद रद्द केलीय. त्यामुळे जय पवारांवर कुणाचा दबाव आहे? जय पवार VSR बद्दल कोणती माहिती समोर आणणार होते? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Jay Pawar Cancels Press Conference  Over VSR company :
Jai Pawar's press conference on the VSR company case is cancelled;saam tv
Published On
Summary
  • जय पवार व्हीएसआर कंपनीबाबत गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा.

  • नियोजित पत्रकार परिषद अचानक रद्द.

  • व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा व्हिडिओ जय पवारांनी शेअर केला होता.

अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत कोण? हा सवाल गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र विचारतोय. रोहित पवारांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिलं, घातपाताचा संशय व्यक्त केला. मात्र त्यानंतर खरी ठिणगी पडली ती दादांचे पुत्र जय पवार यांच्या ट्विटमुळे.. 'व्हीएसआर' कंपनीच्या मालकाचा विमानातील पायलट सीटवर झोपा काढतानाचा व्हिडिओ जय पवारानी समोर आणला.

Jay Pawar Cancels Press Conference  Over VSR company :
Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

आणि त्यानंतर 9 मार्चला पत्रकार परिषदेची घोषणा केली... मात्र पत्रकार परिषदेला एक दिवस बाकी असताना ऐनवेळी जय पवारांची ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आणि जय पवारांवर कुणाचा दबाव आहे ? अशी चर्चा सुरू झाली. एकीकडे रोहित पवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंपासून राज ठाकरेंपर्यंत सर्वांच्या गाठीभेटी घेत आहेत, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी अहवाल आल्यावर बोलू, असं म्हटलंय. त्यामुळे जय पवारांना पत्रकार परिषद रद्द करायला लावून नेमकं कोणतं सत्य लपवलं जातंय? असा सवालही उपस्थित केला जातोय.

Jay Pawar Cancels Press Conference  Over VSR company :
रोहित पवारांपाठोपाठ जय पवार मैदानात, दादांच्या मृत्यूला कारणीभूत कोण?

दरम्यान सीआयडी चौकशीत VSRचे मालक व्ही. के. सिंग यांनी अपघातप्रकरणी वैमानिक सुमित कपूरला जबाबदार धरलंय. अशावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी मात्र प्रफुल्ल पटेल आणि मंत्री राममोहन नायडूंचं नाव घेत मोठा आरोप केलाय.

अजित दादांच्या मृत्यूचं गूढ उकलण्याऐवजी ते अधिकच गुंतागुंतीचं होत चाललेलं असताना जय पवार नेमका कोणता गौप्यस्फोट करणार होते? VSR कंपनीच्या मालकावर ट्विटद्वारे आरोप करणारे जय पवार VSRचं कुठलं गुपित राज्यापुढे आणणार होते का..लवांडेच्या आरोपात तथ्य आहे का असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतायंत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com