

नागपूरच्या महाल परिसरात आक्रमक झालेल्या म्हशीचा नागरिकांवर हल्ला
म्हशीच्या हल्ल्यात ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूने मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर
पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपुरात आक्रमक झालेल्या म्हशीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झालाय. नागपुरात ही दुर्दैवी घटना घडलीय.लक्ष्मण कुंभारे असं 80 वर्षीय वयोवृद्ध मृतकाचं नाव आहेय.
नागपुरात मोकाट वळूने वंदना देवीकर या ज्येष्ठ महिलेसह अनेकांना गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असताना आज सोमवारी महाल परिसरात मोकाट आणि आक्रमक झालेल्या म्हशीने अनेकांना जखमी केले. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर म्हैस आक्रमक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळी घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेल्या 80 वर्षे लक्ष्मण कुंभारे यांचा आज संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज मंगळवारी सकाळी महालातील टिळक पुतळा नजिक जुना हिस्लॉप कॉलेज गल्ली , शिवाजी महाराज चौक, दसरा रोड या भागात आक्रमक झालेल्या म्हशीने अनेकांना जखमी केले होते. आक्रमक झाल्यानंतर सकाळच्या वेळेस रस्त्यांवर मोकाट सैरावैरा धावणाऱ्या म्हशीमुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
तेव्हा महाल परिसरातील बँक ऑफ बडोदा जवळ धावणाऱ्या म्हशीने लक्ष्मण कुंभारे या ज्येष्ठ नागरिकालाही जमिनीवर पाडले होते. डोक्यावर दुखापत होऊन लक्ष्मण कुंभारे जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, म्हशीने अनेकांना जखमी केल्या नंतर स्थानिक नगरसेवक सचिन नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी, पोलिस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आक्रमक झालेल्या म्हशीला भट सभागृह जवळ पकडले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.