
Vaibhav Suryavanshi IPL 2025 : वैभव सूर्यवंशी या १४ वर्षांच्या मुलाने कालच्या (२८ एप्रिल) राजस्थान विरुद्ध गुजरात सामन्यामध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. कमी वयात आयपीएलमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला होता. काल ३५ चेंडूत त्याने १०० धावा करत अनेक रेकॉर्ड मोडले. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मासह अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे.
वैभवच्या कारकीर्दीची आता सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच त्याने मोठमोठ्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. क्रिकेटमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी वैभव खूप मेहतन घेत आहे. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याने अनेक आवडत्या गोष्टींचा त्याग देखील केला आहे. त्याला मटण आणि पिझ्झा खूप आवडायचा पण वजन वाढू नये यासाठी त्याने मटण, पिझ्झा खाणे सोडून दिले, असे वैभवचे कोच मनोज ओझा यांनी सांगितले.
मनोज ओझा टाइम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीत म्हणाले, 'मटण खायचं नाही, अशा वैभवला सूचना देण्यात आल्या होत्या. त्याच्या डाएट चार्टमधून पिझ्झा काढून टाकण्यात आला होता. वैभवला जेवणात चिकन आणि मटण आवडायचे. तो अजूनही लहान आहे, त्याला पिझ्झाही खूप आवडतो. पण तो आता या गोष्टी खात नाही. जेव्हा आम्ही त्याला कितीही मटण द्यायचो, तो एकटा खाऊन टाकायचा. म्हणून तो थोडासा जाड दिसतो.'
गुजरात टायटन्सने दिलेल्या २१० धावांचे लक्ष्य गाठताना वैभव सूर्यवंशीने दमदार खेळीने क्रिकेटप्रेमींना खुश केले. त्याने ७ चौकार आणि ११ षटकार मारत ३८ चेंडूंत १०१ धावा केल्या. त्याला यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग यांची साथ मिळाली. परिणामी १५.५ ओव्हर्समध्येच राजस्थान रॉयल्सने सामना जिंकला. या विजयामुळे राजस्थानचे आयपीएल २०२५ मधील आव्हान टिकून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.