
RR VS GT IPL 2025 : आयपीएल २०२५ मधला ४७ वा सामना सोमवारी (२८ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ऐतिहासिक कामगिरी करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधने घेतले. वैभवच्या वादळी १०१ धावांमुळे राजस्थानचा ८ विकेट्सनी विजय झाला.
गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत राजस्थानसमोर २१० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत केवळ १५.५ ओव्हर्समध्ये हे लक्ष्य गाठले. या विजयात वैभव सूर्यवंशीचे मोलाचे योगदाने होते. त्याने ३८ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने १०१ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट २६५.७९ इतका होता.
दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच वैभवने तुफानी फटकेबाजी करत १७ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्यानंतर ३५ चेंडूत त्याने शतक पूर्ण करत अनेक विक्रम रचले. राशिद खानच्या ओव्हरमध्ये जोरदार षटकार मारत वैभवने शतक पूर्ण केले. त्यावेळेस राजस्थानच्या डगआउटमधून एकच जल्लोष झाला. पायाला झालेल्या दुखापतीमुळे व्हीलचेअरवर बसलेला राहुल द्रविड उभा राहून उत्साहात टाळ्या वाजवू लागला. हा क्षण स्टेडियमवरच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला.
शतकानंतर १२ व्या ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशी बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने वैभवला क्लीनबोल्ड केले. त्यानंतर आलेला नितीश राणाही लवकर माघारी परतला. पण यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग यांना मोर्चा सांभाळत राजस्थानचा विजय निश्चित केला. या विजयामुळे आयपीएल २०२५ मध्ये राजस्थानचे आव्हान अजूनही कायम असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.