India vs Srilanka, Pitch Report And Match Prediction twitter
क्रीडा

IND vs SL: टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी! नाणेफेक जिंकून काय घ्यावं? वाचा सविस्तर

Ankush Dhavre

India vs Srilanka, Pitch Report And Match Prediction:

भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३३ वा सामना खेळण्यासाठी मैदानावर येणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ सेमीफायनलचं तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

तर सुमार फॉर्ममध्ये असलेल्या श्रीलंकेसाठी हा सामना करो या मरो सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड.

पिच रिपोर्ट..

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना होण्यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर २५ वनडे सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १३ सामने जिकंले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने १२ सामने जिंकले आहेत.

ही आकडेवारी पाहिली तर स्पष्ट आहे की, नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा. २०२३ वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला तर, २०२३ स्पर्धेत आतापर्यंत २ सामने खेळले गेले आहेत.

यादरम्यान दक्षिण आफ्रिकेने दोन्ही सामने प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत.दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात १४९ धावांनी तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात २२९ धावांनी विजय मिळवला होता. (Latest sports updates)

कोण- कोणावर पडणार भारी?

वानखेडेची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांसाठी अधिक फायदेशिर ठरते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी २२६ गडी बाद केले आहेत. तर फिरकी गोलंदाजांनी ११८ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे. भारतीय संघ या सामन्यातही प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल करणार नाही.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT