SA vs NZ: क्विंटन डी कॉकचा दरारा कायम! WC 2023 स्पर्धेतील चौथे शतक झळकावत मोठ्या विक्रमाची केली बरोबरी

Quinton De Kock Record: या सामन्यात क्विंटन डी कॉकने मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Quinton De Kock Record
Quinton De Kock Recordtwitter
Published On

Quinton De Kock Records:

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेटच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या क्विंटन डी कॉकने तुफानी शतक झळकावताच वर्ल्डकप स्पर्धेत मोठा रेकॉर्ड केला आहे.

क्विंटन डी कॉक हा आपला शेवटचा वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. या स्पर्धेत त्याची बॅट आग ओकतेय. आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये ५०० पेक्षा अधिक धावा करत ४ शतके झळकावली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही त्याची बॅट जोरदार तळपली आहे. त्याने या सामन्यात तुफान फटकेबाजी करत ११६ चेंडूंचा सामना करत ११४ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारले.

Quinton De Kock Record
IND vs ENG: बॉल ऑफ द वर्ल्डकप! कुलदीपनं शेन वॉर्न सारखाच बॉल फिरवत घेतली बटलरची विकेट; पाहा Video

वर्ल्डकप स्पर्धेत असा कारनामा करणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच फलंदाज...

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत त्याने आतापर्यंत तुफान फटकेबाजी केली आहे. ७ सामन्यांमध्ये त्याने ५४५ धावा ठोकल्या आहेत. दरम्यान ६८ धावांचा पल्ला गाठताच त्याने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत ५०० धावा पूर्ण केल्या आहेत.

यापूर्वी असा कारनामा दक्षिण आफ्रिकेच्या कुठल्याच फलंदाजाने केला नव्हता. या यादीत जॅक कॅलिस दुसऱ्या स्थानी आहे. जॅक कॅलिसने २००७ वर्ल्डकप स्पर्जेत ४८५ धावा केल्या होत्या.

एबी डिव्हिलियर्सने २०१५ वर्ल्डकप स्पर्धेत ४८२ धावा केल्या होत्या. २००७ वर्ल्डकप स्पर्धेत ग्रिम स्मिथने ४४३ आणि पिटर कस्टर्नने १९९२ वर्ल्डकप स्पर्धेत ४१० धावा केल्या होत्या. (Latest sports updates)

Quinton De Kock Record
World Cup 2023 News: पुण्याच्या मैदानावर आफ्रिकेचा डंका, डुसेन अन् डिकॉकच्या शतकांच्या जोरावर उभारला ३५७ धावांचा डोंगर

एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक शतकं..

क्विंटन डी कॉकने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील चौथे शतक ठोकले आहे. यासह त्याने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने देखील एकाच वर्ल्डकप स्पर्धेत ४ शतके झळकावली होती. ५ शतके झळकावणारा भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत अव्वल स्थानी आहे. तर मार्क वॉ, सौरव गांगुली आणि मॅथ्यू हेडनने प्रत्येकी ३-३ शतके झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com