IND vs SL: ०, २५,५३,१९,३३,४,संधी मिळूनही सुपरफ्लॉप ठरलेल्या या खेळाडूला रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता

Shreyas Iyer: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात संघातील प्रमुख खेळाडूला विश्रांती दिली जाऊ शकते.
team india
team indiasaam tv
Published On

Shreyas Iyer,IND vs SL World Cup 2023:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३३ व्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत . हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंनी या स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे.

मात्र श्रेयस अय्यरला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. सध्या भारतीय संघाची प्लेइंग ११ ही वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात मजबूत प्लेइंग ११ आहे. मात्र श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो.

श्रेयस अय्यरची वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील कामगिरी पाहीली तर, ६ सामन्यांमध्ये त्याने अवघ्या १३४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला केवळ १ अर्धशतक झळकावता आलं आहे. या संपूर्ण स्पर्धेत तो शॉर्ट बॉलचा सामना करताना अडचणीत असल्याचं दिसून आलं आहे. ५३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

त्यामुळेच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो नेट्समध्ये शॉर्ट बॉलविरुद्ध खेळायचा सराव करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

team india
Babar Azam: वर्ल्डकप सुरु असतानाच बाबरला लगीन घाई! खरेदी केली तब्बल ७ लाखांची शेरवानी

श्रेयस अय्यर बाहेर झाल्यास कोणाला मिळणार संधी?

श्रेयस अय्यर बाहेर झाल्यास प्लेइंग ११ मध्ये ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत ईशान किशनला सुरुवातीचे २ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र शुभमन गिलचं कमबॅक झाल्यानंतर त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर बसवलं गेलं होतं.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता. तर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ४७ धावांची खेळी केली होती.

भारतीय संघ सध्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत मजबूत स्थितीत आहे. भारतीय संघाने ६ पैकी ६ सामने जिंकले आहेत. या विजयांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारतीय संघाकडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी आहे.

team india
World Cup Points Table: अफगाणिस्तानच्या विजयानं पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर! या ३ संघांचं टेन्शन वाढलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com