Shreyas Iyer comeback T20 BCCI Team India changes saam tv
Sports

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचं टी-20 मध्ये कमबॅक! सिरीजपूर्वीच BCCI कडून टीम इंडियामध्ये दोन मोठे बदल

Shreyas Iyer comeback T20 BCCI Team India changes: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० सिरीजपूर्वी बीसीसीआयने टीम इंडियामध्ये मोठे बदल केलेत. श्रेयस अय्यरचं टी-२० टीममध्ये कमबॅक झालं असून रवि बिश्नोईलाही स्थान मिळालंय.

Surabhi Jayashree Jagdish

उद्या न्यूझीलंडविरूद्ध शेवटचा वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरूद्ध टी-२० सिरीज खेळणार आहे. मात्र बीसीसीआयने या सिरीजपूर्वी टी-२० सिरीजसाठी टीममध्ये बदल केलेत. टी-२० सिरीजसाठी बीसीसीआयने दोन खेळाडूंचा टीममध्ये समावेश केलाय.

श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई या दोघांचीही टी-२० टीममध्ये एन्ट्री झालीये. वनडे सिरीजदरम्यान ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो टी-२० सिरीजमधील पाचही सामन्यांमधून बाहेर झाला आहे. भारत-न्यूझीलंड टी-२० सिरीज २१ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे.

पहिल्या तीन टी-२० सामन्यांसाठी तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलाय. तर चौथ्या टी-२० सामन्यासाठी तिलक वर्मा करण्याची अपेक्षा आहे. दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरची जागा रवी बिश्नोईने घेणार आहे. २०२६ च्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्यास एका महिन्यापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. अशातच तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची दुखापत टीम इंडियासमोरचं मोठं टेन्शन आहे.

टी-२० साठी भारताचा अपडेटेड संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (पहिले तीन T20), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह , हरदीप सिंह, अरविंद कुमार, अरविंद सिंह, कुलदीप यादव, वरून चक्रवर्ती, इशान किशन, रवी बिश्नोई

३ वर्षांनंतर श्रेयस खेळणार भारतासाठी टी-२०

डिसेंबर २०२३ नंतर श्रेयस अय्यर पहिल्यांदाच टी२० टीममध्ये परतणार आहे. त्याने भारतासाठी शेवटचा टी-२० सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. आयपीएल २०२५ मध्ये श्रेयस अय्यरने उत्तम फलंदाजी करत ६०४ रन्स केले होते. यावेळी संपूर्ण सिझनमध्ये १७५ च्या स्ट्राइक रेटने खेळ केला होता.

तर रवी बिश्नोईने भारतासाठी शेवटचा टी-२० सामना जानेवारी २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्याने आतापर्यंत ४२ टी-२० सामन्यांमध्ये ६१ विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: अनपेक्षित घटना घडतील, वैवाहिक जीवनात येईल आनंद; ३ राशींसाठी आज दिवस ठरेल महत्त्वाचा

BMC Elections: एकीकडं महापौरपदासाठी चढाओढ, दुसरीकडं हॉटेल पॉलिटिक्स, मुंबईत शिजतंय तिसरंच राजकारण...

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्टर प्लॅन

शतप्रतिशत भाजपामुळे मित्रपक्षांनाही धक्का, भाजपने दाखवला मित्रपक्षांना हिसका

२५ वर्षांची सत्ता संपली! ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका का गेली?

SCROLL FOR NEXT