

विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपलं अव्वल स्थान पटकावलं आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये विराट कोहली नंबर १ फलंदाज बनला आहे. तब्बल 1,403 दिवसांनंतर कोहलीने अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. रोहित शर्माला मागे टाकत विराटने पहिलं स्थान पटकावलंय. तर वनडे रँकिंगमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय.
भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा क्रिकेट सामना खेळवण्यात येतोय. न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराटने ९१ चेंडूंमध्ये ९३ रन्सची खेळी केली होती. त्यावेळी त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील देण्यात आला होता.
विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सिरीजनंतर कोहलीने गेल्या ५ डावांमध्ये ७४ नाबाद, 135, 102, 65 नाबाद आणि 93 रन्सची खेळी केलीये. विराट जुलै २०२१ नंतर पहिल्यांदा बॅटींग रॅंकिंगमध्ये टॉपवर पोहोचला आहे.
आयसीसी रँकिंगच्या आकडेवारीवर नजर टाकली तर विराट कोहली ७८५ पॉईंट्सने पहिल्या स्थानावर आहे. तर रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर घसरलाय. रोहित ७७५ पॉईंट्सने तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर वनडे रँकिंगच्या स्थानावर डॅरील मिचेल ७८४ पॉईंट्ससह आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल पाचव्या स्थानी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.