

येत्या ११ जानेवारीपासून भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना ११ जानेवारीमध्ये वडोदऱ्यात खेळवला जाणार आहे. या सिरीजसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. अशातच विराट कोहली पहिल्या वनडेपूर्वी वडोदऱ्याला पोहोचलाय. मात्र एअरपोर्टवर त्यांच्या तुडुंब गर्दीचा सामना करावा लागलाय.
सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीयोमध्ये विराट कोहली वडोदा एअरपोर्टवर पोहोचला आहे. यावेळी चाहत्यांनी त्याचं अगदी उत्साहाने स्वागत केलं आहे. विराट कोहलीला पाहण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी जमली होती आणि चाहत्यांनी "कोहली! कोहली!" अशा घोषणा देत त्याचं स्वागत केलं.
विराट कोहलीने काळा टी-शर्ट आणि ब्लॅक गॉगल घातला होता. यावेळी एअरपोर्टवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला घेरलं. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला गर्दीतून कसंबसं बाहेर काढत त्याच्या गाडीपर्यंत नेलं. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोकांचा जमाव झाला होता.
भारताचा स्टार फलंदाज विराट नुकताच दिल्लीकडून खेळताना दिसला होता. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत त्याने दिल्लीकडून दोन सामन्यात २०८ रन्स केले होते. त्याने आंध्र प्रदेशविरुद्ध १३१ आणि गुजरातविरुद्ध ७७ रन्स केलेत. यादरम्यान विराटने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,००० रन्सही पूर्ण केलेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद १६,००० रन्स पूर्ण करणाऱ्या सचिन तेंडुलकरला त्याने मागे टाकलंय.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये विराट कोहलीने कमबॅक केलं आहे. ज्या ठिकाणी तो पहिल्या दोन सामन्यात रन्स न करता बाद झाला होता. मात्र त्यानंतर विराटची बॅट चांगलीच तळपली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांमध्ये त्याने ३०२ रन्स केलेत. ज्यात दोन शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.