LIC Scheme: एलआयसीची जबरदस्त योजना! महिलांना दर महिन्याला मिळणार ₹७०००; वाचा सविस्तर

LIC Bima Sakhi Yojana: एलआयसीने विमा सखी योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला ७००० रुपये दिले जातात. एलआयसी विमा सखी योजनेत महिलांना ट्रेनिंग दिली जाते.
LIC Scheme
LIC SchemeSaam TV
Published On
Summary

एलआयसी विमा सखी योजना

महिलांना दर महिन्याला मिळतात ७००० रुपये

१०वी पास महिला करु शकतात अर्ज

केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. याचसोबत विविध सरकारी कंपन्यांनीही योजना सुरु केल्या आहेत. या योजनांमध्ये सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने महिलांसाठी योजना सुरु केली आहे.यामध्ये महिलांना दर महिन्याला ७००० रुपये दिले जातात.

LIC Scheme
PM Mudra Scheme: दहावी नापास आहात, व्यवसाय करायचाय? सरकार करणार मदत, गॅरंटीशिवाय २० लाखांचे कर्ज, वाचा नेमकी योजना

एलआयसीने विमा सखी योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला ७००० रुपये मिळू शकतात. या योजनेत ग्रामीण भागातील महिलांना मदत केली जाते. महिलांना काम करण्याची संधीदेखील मिळते. याचसोबत दर महिन्याला कमाईदेखील होते.

एलआयसी विमा सखी योजनेत महिलांना एलआयसी एजेंट म्हणून ट्रेनिंग दिली जाते. ही ट्रेनिंग दिल्यानंतर महिलांना पहिल्या वर्षी ७००० रुपये, दुसऱ्या वर्षी ६००० रुपये आणि तिसऱ्या वर्षी ५००० रुपये दिले जातात. ट्रेनिंगदरम्यान महिलांना टार्गेट दिले जाते. यानंतर कमिशन बेस्ड इन्सेन्टिव्ह दिले जातात. वीमा सखी योजनेत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एलआयसीच्या जवळच्या ब्रँचमध्येही जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात.

LIC Scheme
Mazi Kanya Bhagyashree: लेकीच्या जन्मानंतर मिळतात ५०,००० रुपये; माझी कन्या भाग्यश्री योजना नक्की आहे तरी काय?

एलआयसीच्या या योजनेत ग्रामीण भागातील महिलांना ट्रेनिंग दिले जाते. त्यांना एलआयसीच्या काही टार्गेट दिले जातात. त्यांना एलआयसी योजनेबद्दल माहिती द्यायची आहे. या योजनेसाठी १०वी पास महिला अर्ज करु शकतात. याचसोबत अर्ज करताना उमेदवारांना इन्कम टॅक्स प्रुफ, रहिवासी प्रमाणपत्र द्यायचे आहे. या योजनेत १८ ते ७० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात.

LIC Scheme
Government Scheme: मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मिळणार १.५० लाख रुपये, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com