Government Scheme: मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मिळणार १.५० लाख रुपये, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Chhattisgarh Government Scheme: छत्तीसगड सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मुलींसाठी राणी दुर्गावती योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींना आर्थिक मदत मिळणार आहे.
Government Scheme
Government SchemeSaam tv
Published On
Summary

छत्तीसगड सरकारचा अर्थसंकल्प सादर

मुलींसाठी केली मोठी घोषणा

मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मिळणार दीड लाख रुपये

आज छत्तीसगड सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे. या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी महत्त्वाची घोषणा करण्या आली आहे. मुलींसाठी नवीन राणी दुर्गावती योजना सुरु करण्यात आली आहे. याचसोबत अस्तित्वात असलेल्या योजनेसाठी निधी वाढवण्यात आला आहे.

Government Scheme
Government Scheme: या राज्य सरकारची खास योजना! मुलींना मिळतात ₹५०,००० रुपये ; वाचा सविस्तर

नवीन योजनेची घोषणा

अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी योजनेबाबत घोषणा केली आहे.मुलींसाठी राणी दुर्गावती योजनेची घोषणा केली आहे. यामध्ये मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला दीड लाख रुपये दिले जाणार आहेत. मुलींना आर्थिक सुरक्षितता आणि स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. याबाबत लवकरच अधिक माहिती दिली जाणार आहे.

महतारी वंदन योजनेसाठी निधी

छत्तीसगड सरकारने दोन वर्षांसाठी महतारी वंदन योजना सुरु केली होती. योजनेसाठी अर्थसंकल्पात ८,२०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिलांसाठी ही योजना सुरु केली होती. या योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १००० रुपये जमा केले जातात. या योजनेला आता दोन वर्ष पूर्ण झाले आहेत.

महतारी वंदन योजनेअंतर्गत आतापर्यंत २४ हप्ते जमा केले आहेत. या योजनेत २१ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांना लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. त्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.

Government Scheme
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना... ५ वर्षात फक्त व्याजातून मिळणार १० लाख रुपये; कॅल्क्युलेशन वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com