Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना... ५ वर्षात फक्त व्याजातून मिळणार १० लाख रुपये; कॅल्क्युलेशन वाचा

Post office Senior Citizen Scheme: पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला फक्त व्याजातून १० लाख रुपये कमवता येणार आहे.
Post Office Scheme
Post Office SchemeSaam Tv
Published On
Summary

पोस्टाची जबरदस्त योजना

फक्त व्याजातून मिळणार १० लाख रुपये

महिन्याला मिळणार १७,००० रुपये

प्रत्येकाने भविष्याच्या दृष्टीने आतापासूनच आर्थिक बचत करायला हवी. प्रत्येकाने आपल्या पगारातील एक ठरावी रक्कम बाजूला काढून ठेवावी. ही रक्कम तुम्ही वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवू शकतात. भविष्यात सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक मदत होईल. यासाठी अनेक योजना आहेत. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन स्कीम. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्ही दर महिन्याला १७००० रुपये कमवू शकतात. या योजनेत फक्त व्याजातून तुम्हाला १० लाख रुपये मिळणार आहे.

Post Office Scheme
Tax Free Scheme: १२ लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आहे? तर या ४ योजनांमध्ये करा गुंतवणूक; टॅक्स लागेल शून्य

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही गुंतवलेले पैसे सुरक्षित असणार आहे. झिरो रिस्क इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. या योजनेतील पैशांवर स्वतः सरकार गॅरंटी देते. या योजनेत बँक एफडीपेक्षा जास्त व्याजदर मिळते. त्यामुळे तुमच्यासाठी गुंतवणूकीची चांगली संधी आहे.

पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुम्ही फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत पैसे गुंतवल्यावर तुम्हाला दर महिन्याला रेग्युलर इन्कम सुरु होईल. या योजनेत टॅक्समधूनदेखील सूट मिळते. कलम 80Cअंतर्गत १.५ लाखांवर सूट मिळते.

या योजनेत ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक अकाउंट उघडू शकतात. यामध्ये व्हीआरएस घेतलेले ५५ ते ६० वयोगटातील नागरिक गुंतवणूक करु शकतात. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड ५ वर्षांचा आहे. या योजनेत तुम्हाला तीन महिन्याच्या आधारावर व्याज दिले जाते.

Post Office Scheme
DDA Housing Scheme : राजधानीत फक्त १० लाखांत आलिशान घर, DDA ची हाऊसिंग स्कीम लॉन्च, वाचा सविस्तर

फक्त व्याजातून मिळणार १० लाख रुपये

सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमसाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट उघडू शकतात. या योजनेत सिंगल अकाउंटमधून १५ लाख तर जॉइंट अकाउंटमधून ३० लाख रुपये गुंतवू शकतात. तुम्ही जर २५ लाख रुपये गुंतवले तर तिमाही आधारावर फक्त व्याजातून ५१२५० रुपये मिळणार आहे. जर ५ वर्षांसाठी तुम्ही ही रक्कम गुंतवल तर तुम्हाला १०,२५,००० रुपये फक्त व्याजातून मिळणार आहे. दर महिन्याला तुम्हाला १७, ०८३ रुपये मिळणार आहे.

Post Office Scheme
Post Office Scheme : एक लाख गुंतवा अन् व्याजातून ₹४४,९९५ मिळवा; पोस्टाच्या भन्नाट योजनेचं कॅल्क्युलेशन वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com