Tax Free Scheme: १२ लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आहे? तर या ४ योजनांमध्ये करा गुंतवणूक; टॅक्स लागेल शून्य

Tax Free Government Scheme: तुमचे उत्पन्न जर जास्त असेल तर टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. तुमचे उत्पन्न जर १२लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकतात.
Tax Free
Tax FreeSaam Tv
Published On
Summary

१२ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

या ४ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा

मिळणाक भरघोस परतावा आणि टॅक्सदेखील शून्य

प्रत्येकाला आपले भविष्य सुरक्षित करायचे असते. यासाठी आधीपासूनच गुंतवणूक करणे गरजेचे असते. जर तुम्ही चांगल्या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. तुम्ही या ४ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही वर्षाला १२ लाखांचा फंड जमा करु शकतात. याचसोबत तुम्हाला टॅक्सदेखील भरावा लागणार नाहीये. त्यामुळे डबल फायदा होणार आहे.

Tax Free
DDA Housing Scheme : राजधानीत फक्त १० लाखांत आलिशान घर, DDA ची हाऊसिंग स्कीम लॉन्च, वाचा सविस्तर

१. नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension Scheme)

नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला थेट 80CCD(1B) अंतर्गत ५० हजारांची अतिरिक्त टॅक्स सूट मिळते. ही 80C अंतर्गत येणाऱ्या १.५ लाखांपेक्षा वेगळी असणार आहे. यामुळे तुमचे टॅक्सची रक्कम कमी होणार आहे. याचसोबत एनपीएस इक्विटी, सरकारी बॉन्डमध्ये गुंतवणूक करते. त्यामुळे १० ते १२ टक्के परतावा मिळू शकतो.

Tax Free
Post Office Scheme : एक लाख गुंतवा अन् व्याजातून ₹४४,९९५ मिळवा; पोस्टाच्या भन्नाट योजनेचं कॅल्क्युलेशन वाचा

२. पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF Scheme)

जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पीपीएफ बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला 80C अंतर्गत १.५ लाखांवर टॅक्सपासून सूट मिळते. तसेच या योजनेत ७.१ टक्के व्याजदर मिळते. याचसोबत १५ वर्षांच्या गुंतवणूकीवर चक्रव्याढ व्याजदेखील मिळते.

३. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम अंतर्गत तुम्हाला कलम 80C अंतर्गत १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर सूट मिळते. ३ वर्षांच्या लॉक इन पीरियडसाठी गुंतवणूक केली तर १२ ते १५ टक्के रिटर्न मिळते. ही योजना खूपच सुरक्षित आहे.

४. ULIP आणि पेन्शन प्लान

ULIP आणि पेन्शन प्लान हा जास्त उत्पन्न गटासाठी फायदेशीर आहे. यामध्ये 80C/80CCC अंतर्गत सूट मिळते. तसेच 10(10D) अंतर्गत टॅक्स फ्री मॅच्युरिटीचा लाभ घेता येतो.

Tax Free
Government Scheme: खुशखबर! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार ₹६०००; काय आहे योजना? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com