NPS : महिन्याला १ लाखांची पेन्शन मिळवायचीये? नॅशनल पेन्शन योजनेत आजच गुंतवणूक करा, मिळेल भरघोस परतावा

National Pension Scheme: सरकारच्या नॅशनल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भरघोस परतावा मिळणार आहे. या योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला भरघोस व्याजदर मिळणार आहे.
Pension Scheme
PensionSaam Tv
Published On

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी प्रयत्न करत असतात. वेगवेगळ्या योजना, शेअर मार्केट, एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असतात. तुम्ही नॅशनल पेन्शन योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला महिन्याला १ लाखांची पेन्शन मिळू शकते. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे.

नॅशनल पेन्शन स्कीम ही सरकारी योजना आहे. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला गुंतवणूक करायची आहे. या योजनेत तुम्हाला सर्वात जास्त परतावा मिळतो.

Pension Scheme
Atal Pension Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् महिन्याला ५००० रुपये पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजना नेमकी आहे तरी काय?

नॅशनल पेन्शन स्कीम ही मार्केटशी लिंक आहे. या योजनेत प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचारी गुंतवणूक करु शकतात. या योजनेत सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे. या योजनेत कर्मचारी आणि नियोक्ता यांना पैसे द्यायचे असतात. या योजनेत तुम्हाला मार्केटनुसार रिटर्न मिळणार आहेत.

एनपीएसचे अकाउंट तुम्ही देशातून कुठूनही हँडल करु शकतात. या योजनेत टियर १ आणि टियर २ अकाउंट उघजले जाऊ शकतात.या योजनेत गुंतवलेली ६० टक्के रक्कम तुम्ही काढू शकतात. तर ४० टक्के रक्कम अॅन्युटी पेन्शन म्हणून ठेवली जाणार आहे. या योजनेत तुम्ही महिन्याला १ लाखांची पेन्शन मिळवू शकतात.

या योजनेत जर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर १ लाखांची पेन्शन मिळवायची असेल तर दर महिन्याला २० हजार रुपये टाकावे लागणार.या योजनेत तुम्ही दरवर्षी १० टक्के रक्कम वाढवू शकतात.या योजनेत जर तुम्हाला १० टक्के रिटर्न मिळाले तर तुमच्याकडे ३ कोटी २३ लाख रुपये जमा होतील. त्यावर १.८५ कोटी रुपये रिटर्न मिळेल. या योजनेत टॅक्स सेव्हिंग ४१.२३ लाख रुपये असणार आहे.

Pension Scheme
SBI Scheme: स्टेट बँकेची ४४४ दिवसांची जबरदस्त योजना! मिळणार भरघोस परतावा

या योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला ८ टक्के अॅन्युटी रेट मिळणार आहे. त्यामुळे पेन्शन वेल्थ १.६२ कोटी रुपये असणार आहे. यामुळे तुम्हाला महिन्याला १ लाख रुपयांची पेन्शन मिळू शकते. तसेच तुम्हाला १.६२ कोटी रुपयांचा फंडदेखील मिळेल. त्यामुळे तुम्ही आतापासून गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्हाला आर्थिक अडचण भासणार नाही.

Pension Scheme
MSSC Scheme Benefits: बायकोच्या नावानं २ लाख रुपये गुंतवा; मिळणार ३२००० रिटर्न, काय आहे योजना!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com