
प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला भविष्यात दर महिन्याला पैसे मिळतात. सेवानिवृत्तीनंतर नागरिकांना दर महिन्याला पैसे मिळावेत, यासाठी अटल पेन्शन योजना राबवण्यात आली आहे.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळतात. या योजनेत आतापर्यंत ७ कोटी लोकांनी लाभ घेतला आहे. या योजनेत तुम्ही कमीत कमी रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करु शकतात. तुम्ही दर दिवशी फक्त ७ रुपये जमा करुन महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात. (Atal Pension yojana)
सरकारची अटल पेन्शन योजना ही खूप सुरक्षित आहे. यात तुम्ही १००० ते ५००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.या योजनेत १८ ते ४० वयोगटातील लोक गुंतवणूक करु शकतात.
या योजनेत तुम्ही कमीत कमी २० वर्षांपर्यंत गुंतवणूक करायला हवी. जर तुम्ही सध्या ४० वर्षांचे असाल आणि तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला पेन्शन वयाच्या ६० व्या वर्षी मिळेल. समजा जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला दर महिन्याला २१० म्हणजेच दर दिवशी ७ रुपये जमा करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ५००० रुपये मिळतील. (Atal Pension Yojana)
अटल पेन्शन योजनेत जर तुम्ही दर महिन्याला ४२ रुपये गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला १००० रुपये पेन्शन मिळणार आहे.या योजनेत पती-पत्नी दोघेही लाभ घेऊ शकतात. या दोघांना मिळून १०,००० रुपयांची पेन्शन मिळेल.या योजनेत तुम्हाला कलम 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.