Bharat Jadhav
जर तुम्हाला यावर्षात पैसे वाचायचे असतील तर पैशांची गुंतवणूक करणं आवश्यक आहे . गुंतवणूक करताना काही गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत.
जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ठोस नियोजन आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या कमाईतून किती बचत करू शकता याचा विचार करा.
बचत किती रुपयांची करायची आहे हे निश्चित झाल्यानंतर पैसा कुठे गुंतवायचा हे ठरवा. जसे की, म्यूचुअल फंड, यूनिट लिंक्ड इन्वेस्टमेंट प्लान, एंडोमेंट प्लान.
सर्वात लोकप्रिय गुंतवणूक फॉर्म्युला 50-20-30 असा आहे. यावर आधारित गुंतवणूक केल्यास तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही.
या फॉर्म्युला अंतर्गत तुम्हाला तुमची कमाई तीन भागात विभागायची आहे.
या फॉर्म्युल्यानुसार, तुम्ही टॅक्सनंतर तुमच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम घरगुती खर्चासाठी खर्च करा.
पगाराच्या 20 टक्के रक्कम अधूनमधून गरजांसाठी (गैर-आवश्यक खर्च) ठेवावी लागेल.
50-20-30 या नियमानुसार आर्थिक नियोजन केल्यावर काही काळानंतर तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय चांगली बचत झालेली दिसेल.
पगाराची 30 टक्के रक्कमेची गुंतवणूक करावी. ही गुंतवणूक तुमच्या भविष्यातील गरजा (अनपेक्षित आणीबाणी) पूर्ण करेल.