Bigg Boss Marathi 6 : शेरास सव्वाशेर! संस्कृतीचा हलगर्जीपणा तिला पडला महागात; विशालने चलाखीने Power Key मिळवली, VIDEO

Vishal Kotian - Sanskruti Salunke Fight : बिग बॉसच्या घरात नवीन वाद सुरू झाला आहे. विशालने चलाखीने संस्कृतीची पावर की मिळवली आहे. ज्यामुळे विशाल आणि संस्कृतीमध्ये वाद होतो.
Vishal Kotian - Sanskruti Salunke Fight
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात येताच संस्कृती आणि विशाल यांच्यात भांडण झाले आहे.

विशालने संस्कृतीची Power key मिळवली.

घरात राखी सावंत तन्वीला टार्गेट करताना दिसत आहे.

'बिग बॉस मराठी 6'च्या घरात तीन वाइल्ड कार्ड स्पर्धक आले आहेत. त्यांनी घरात येताच धुमाकूळ घातला आहे. बिग बॉसच्या घरात रेवा कौरासे, संस्कृती साळुंके आणि संकेत पाठक हे तीन कलाकार वाइल्ड कार्ड म्हणून येतात. सर्वप्रथम रेवा कौरासे आणि रुचिताचे भांडण होते. त्यानंतर आता घरात संस्कृती साळुंके आणि विशाल यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. विशालने चलाखीने संस्कृतीची पावर की मिळवली आहे.

बिग बॉसच्या घरात आल्यापासून संस्कृती साळुंके आणि रेवा कौरासे विशालशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे मागे-पुढे करत आहे. यामुळे रुचिताला प्रचंड राग आला आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विशाल आणि संस्कृती बोलत असताना तो हुशारीने तिच्या हातातली पावर की उचलतो. तेव्हा तन्वी मोठ्याने बोलते की, "विशालच्या हातात तिची पावर की आहे..." घरातील सर्व सदस्य पाहतच राहतात. संस्कृती पावर की पुन्हा मिळवण्यासाठी विशालच्या मागे धावताना दिसते.

संस्कृती विशालकडून पावर की घेण्यासाठी त्याला खूप त्रास देताना दिसते. विशाल झोपलेला असताना ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. त्याच्या तोंडावर पाणी टाकते. त्यानंतर विशाल संस्कृतीच्या डोक्यावर पाणी टाकतो. घरात फुल ड्रामा पाहायला मिळत आहे. आता बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी 6' च्या घरातून आतापर्यंत 8 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे- राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे, ओंकार राऊत, करण सोनावणे, आयुष संजीव, सचिन कुमावत आणि रोशन भजनकर. आता बिग बॉसच्या घरात आठव्या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार आणि घराबाहेर जाणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Vishal Kotian - Sanskruti Salunke Fight
Rashmika-Vijay Wedding : विजयचा हात धरून रश्मिका बसली पूजेला, पारंपरिक लूकमध्ये 'नॅशनल क्रश'ला लोक पाहतच राहिले|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com