ZP Election Result: अजितदादांच्या राष्ट्रवादीची 'पावर' कायम, १४३ जागा मिळवत ठरला राज्यातील दुसरा मोठा पक्ष
Ajit Pawar Saam tv

ZP Election Result: अजितदादांच्या राष्ट्रवादीची 'पावर' कायम, १४३ जागा मिळवत ठरला राज्यातील दुसरा मोठा पक्ष

Pune ZP Election Result: जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीच्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
Published on

Summary -

  • जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने १४८ जागांवर विजय मिळवला

  • भाजप १९८ जागांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला

  • शिंदे गटाची शिवसेना १३९ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर

  • पुणे जिल्हा परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीची राज्यात पावर पाहायला मिळत आहे. अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीला १४८ जागा मिळवण्यात यश आले आहे. अजित पवार यांच्या आठवणीने राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे पाहायला मिळाले.

अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार सभा आणि रॅली न काढण्याचा निर्णय घेतला होता. कोणताही प्रचार न करता राज्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, अजितदादांचा राष्ट्रवादी पक्षाने १४८ जागांवर विजय मिळवत राज्यातील दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. भाजप १९८ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिंदेच्या शिवसेनाला १३९ जागा मिळवण्यात यश आले. शिवसेना हा राज्यातील तिसरा मोठा पक्ष ठरला.

ZP Election Result: अजितदादांच्या राष्ट्रवादीची 'पावर' कायम, १४३ जागा मिळवत ठरला राज्यातील दुसरा मोठा पक्ष
ZP election Result : विजय पाहण्यासाठी अजितदादा हवे होते, उमेदवाराच्या डोळ्यात आले टचकन पाणी

ठाकरेंच्या शिवसेनेला ३७ जागा, मनसेला २ जागा, काँग्रेसला ४८ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला २१ जागा, आणि इतरांना ३८ जागांवर विजय मिळवण्यात यश आले. अद्याप अनेक जागांवरचा निकाल येणं बाकी आहे. याठिकाणी मतमोजणी सुरू आहे. पूर्ण निकाल आल्यानंतर कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला हे चित्र स्पष्ट होईल.

ZP Election Result: अजितदादांच्या राष्ट्रवादीची 'पावर' कायम, १४३ जागा मिळवत ठरला राज्यातील दुसरा मोठा पक्ष
ZP Election Result: कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का, महिला कार्यकर्त्यांनी केळी दाखवून डिवचलं

तर, पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या कलानुसार, अजितदादांच्या राष्ट्रवादीने सर्वात जास्त ४७ जागांवर विजय मिळवला असून त्यांची सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तर पुणे जिल्हा परिषदेमध्ये भाजप ९, शिंदेसेना ४, शिवसेना ६, शरद पवारांची राष्ट्रवादीला १ जागा मिळवण्यात यश मिळाले.

ZP Election Result: अजितदादांच्या राष्ट्रवादीची 'पावर' कायम, १४३ जागा मिळवत ठरला राज्यातील दुसरा मोठा पक्ष
ZP Election Results : धक्कादायक निकाल! सोलापूरमध्ये आमदाराच्या मुलाचा पराभव, खासदाराला जोरदार धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com