Rashmika-Vijay Wedding : विजयचा हात धरून रश्मिका बसली पूजेला, पारंपरिक लूकमध्ये 'नॅशनल क्रश'ला लोक पाहतच राहिले|VIDEO

Rashmika-Vijay Viral Video : साऊथचे क्यूट कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर दोघे सत्यनारायणाची पूजा करताना स्पॉट झाले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Rashmika-Vijay Viral Video
Rashmika-Vijay Wedding saam tv
Published On
Summary

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडांचा शाही विवाह सोहळा थाटात पार पडला.

दोघांनी एकत्र भगवान सत्यनारायणाची पूजा देखील केली.

4 फेब्रुवारीला त्यांचे रिसेप्शन पार पडणार आहे.

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना आणि बॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडा 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. लग्नानंतर विजय आपल्या बायकोला घेऊन गावी गेला आहे. रश्मिका आणि विजय थुम्मनपेट येथे पोहचले. त्यांनी येथे एकत्र भगवान सत्यनारायणाची पूजा केली. ज्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात रश्मिका-विजय यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला.

रश्मिका आणि विजयची एक झलक पाहण्यासाठी संपूर्ण गाव उत्सुक होते. रश्मिकाच्या सासूनेही तिच्या लाडक्या सुनेचे मनापासून स्वागत केले. सासू-सुनेची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पूजा करण्यासाठी रश्मिका आणि विजय एकत्र बसले आहेत. दोघे एकमेकांशी बोलताना, हसताना दिसत आहे. रश्मिकाच्या चेहऱ्यावर नव्या नवरीचा ग्लो पाहायला मिळत आहे. दोघे एकमेकांत मग्न झाले आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीने आणि लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघे एकत्र खूपच आनंदी दिसत होते.

रश्मिका आणि विजयचा लूक

विजयने पूजेदरम्यान बेज रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर रश्मिकाने ऑफ-व्हाइट आणि केशरी रंगाची साडी नेसली आहे. सुंदर साज श्रृंगार करून विजयची नवरी नटली होती. केसात सुंदर गजरा माळला होता. देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण देवरकोंडा कुटुंब आणि गाव पूजेत सहभागी झाले होते. पूजेनंतर दोघांनी चाहत्यांशी संवाद साधला.

रश्मिका आणि विजयने उदयपूर येथीस 'आयटीसी मेमेंटोस' या लग्जरी हॉटेलमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने तेलुगू हिंदू आण कोडावा अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केले. रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला. लग्नाचे रिसेप्शन 4 मार्चला थाटामाटात पार पडणार आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 2018 ला रिलीज झालेल्या 'गीता गोविंदम' आणि 2019 साली 'डियर कॉमरेड' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Rashmika-Vijay Viral Video
Famous Actor : प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला पितृशोक, सामाजिक अन् मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com