

राजकोटमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना खेळवण्यात येतोय. न्यूझीलंडच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यामध्ये टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला फारसा चांगला खेळ करता आला नाही. अशातच भारताचा विकेटकीपर फलंदाज के.एल राहुलने शतक ठोकलंय. यावेळी टीम इंडियाने ७ विकेट्स गमावून न्यूझीलंडसमोर २८५ रन्सचं आव्हान ठेवलंय.
दुसऱ्या वनडे सामन्यात केएल राहुलची आक्रामक फलंदाजी पाहायला मिळाली. टीम इंडिया बिकट परिस्थितीत असताना केएल राहुलने एका बाजू लढवत शतक झळकावलं. ४९ व्या ओव्हरच्या शेवटच्या गोलंदाजीवर सिक्स लगावत त्याने शतक पूर्ण केलं आहे. त्याच्या वनडे करियरमधील हे आठवं शतक होतं. ८७ चेंडूंमध्ये राहुलने सेंच्युरी पूर्ण केली. यावेळी सेंच्युरी झळकावल्यानंतर त्याने खास पद्धतीने सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनवरून त्याने ही सेंच्युरी त्याच्या चिमुकल्या मुलीसाठी लगावली असल्याचं समजतंय.
टीम इंडियाने ५० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावत २८४ रन्स केले. यामध्ये केएल राहुलने ९२ चेंडूंमध्ये ११२ रन्सची नाबाद खेळी केली. त्याने यामध्ये ११ चौकार आणि १ षटकार लगावलाय. कर्णधार शुभमन गिलने अर्धशतक झळकावलं असून ५३ चेंडूंमध्ये ५६ रन्सची खेळी केलीये.
या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित २४ तर विराट २३ रन्समध्ये पव्हेलियनमध्ये परतले. टीमचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अवघ्या ८ रन्सनवर त्याने आपली विकेट गमावली. कोहलीची विकेट गेल्यानंतर रविंद्र जडेजा आणि केएल राहुलने डाव सावरला. परंतु 191 च्या स्कोरवर जडेजा माघारी परतला. त्यानंतर केएल आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यात अर्धशतकाची पार्टनरशिप झाली.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.