Vijay Hazare Trophy: सेमीफायनमध्ये या ४ टीम्सने मारली दणक्यात एन्ट्री; पाहा कुठे आणि कधी रंगणार सामने

Vijay Hazare Trophy 2025-26 Semifinalist: विजय हजारे ट्रॉफी 2025-26 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. क्वार्टर फायनलनंतर चार संघांनी सेमीफायनलमध्ये भव्य प्रवेश केला आहे.
Vijay Hazare Trophy 2025-26 Semifinalist
Vijay Hazare Trophy 2025-26 Semifinalistsaam tv
Published On

24 डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ ला सुरुवात झाली होती. आता तब्बल ३ आठवड्यानंतर सेमीफायनलमध्ये एन्ट्री केलेल्या ४ टीम्सची नावं समोर आली आहेत. १२ जानेवारी रोजी कर्नाटक आणि सौराष्ट्रने क्वार्टर फायनलमध्ये विजय मिळवून सेमीफायनलच्या फेरीत प्रवेश केला होता. तर आता विदर्भ आणि पंजाब टीमने विजय मिळवत विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनलचं तिकीट पटकावलं.

त्यामुळे आता सेमीफायनल-१ आणि सेमीफायनल-२ मध्ये कोणती टीम कोणाशी सामना करणार आहे हे देखील स्पष्ट झालंय. पहिल्या सेमीफायनलमध्ये कर्नाटकचा सामना विदर्भाशी होणार आहे तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सौराष्ट्र आणि पंजाब एकमेकांविरूद्ध मैदानात उतरणार आहे. हे दोन्ही सामने बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड १ वर खेळवण्यात येणार आहेत.

Vijay Hazare Trophy 2025-26 Semifinalist
Shikhar Dhawan Engagement: शिखर धवनने गर्लफ्रेंड सोफीसोबत केला साखरपुडा; घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर गब्बर अडकणार लग्नाच्या बेडीत

पंजाबच्या टीमने तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये मध्य प्रदेश टीमचा १८३ रन्सने पराभव सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने टॉप ऑर्डर फलंदाजांच्या फलंदाजीच्या जोरावर ५० ओव्हर्समध्ये ६ विकेट्स गमावून ३४५ रन्सचा मोठा आकडा गाठला.

पंजाबच्या ४ फलंदाजांनी शानदार अर्धशतकं झळकावली. ज्यामध्ये २ अर्धशतकं ओपनिंगला आलेल्या दोन खेळाडूंनी झळकवली. हरनूर सिंग आणि कर्णधार प्रभसिमरन यांनी पहिल्या विकेटसाठी ११६ रन्सची पार्टनरशिप केली. हरनूरने ५१ तर प्रभसिमरनने ८८ रन्स केले. अनमोलप्रीत सिंगने ७० आणि नेहल वधेराने ५६ रन्सची खेळी केली.

Vijay Hazare Trophy 2025-26 Semifinalist
IND vs NZ ODI: पहिल्याच सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत, या खेळाडूला मिळाली संधी

चौथ्या क्वार्टर फायनलमध्ये विदर्भाच्या टीमने दिल्लीला उपांत्य फेरीत जाण्यापासून रोखलं. प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने ३०० रन्स केले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीच्या टीमचा खेळ ४५.१ ओव्हरमध्ये २२४ रन्सवर आटोपला. विदर्भाकडून नचिकेत भुतेने चार विकेट्स घेतले. तर कर्णधार हर्ष दुबेने तीन विकेट्स घेतले.

Vijay Hazare Trophy 2025-26 Semifinalist
Shubman Gill: नशीबात असलेलं कोणी हिरावू शकत नाही...! टी-२० वर्ल्डकपमधून वगळल्यावर शुभमन गिलने सोडलं मौन

सेमीफायनलच्या सामन्याचं शेड्यूल

  • १५ जानेवारी- पहिला उपांत्य सामना - कर्नाटक विरुद्ध विदर्भ

  • १६ जानेवारी- दुसरा उपांत्य सामना - सौराष्ट्र विरुद्ध पंजाब

  • १८ जानेवारी- अंतिम सामना, बंगळुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com