Manasvi Choudhary
होळी खेळताना मोबाईल फोनची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न सर्वानाच पडतो.
होळीचे रंग किंवा पाण्यापासून मोबाईल फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही सोप्या टिप्स फॉलो करा.
बाजारात मोबाईलच्या सेफ्टीसाठी खास वॉटरप्रूफ पाऊच मिळतात ते तुम्ही वापरू शकता.
फोनचा चार्जिंग पोर्ट, हेडफोन जॅक आणि स्पीकरच्या जागी सेलो टेप लावा यामुळे सुका रंग किंवा पाणी फोनच्या आत शिरणार नाही.
होळी खेळायला जाण्यापूर्वी स्क्रिन प्रोटेक्टरचा वापर करा म्हणजे फोन सुरक्षित राहील.
फोनमध्ये पाणी गेल्यास ताबडतोब तांदळाच्या डब्ब्यात ठेवा तांदूळ पाणी खेचून घेतो.
कितीही घाई असली तरी, पूर्णपणे ओल्या किंवा रंगाने माखलेल्या हातांनी फोनला स्पर्श करू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.