Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादववर आरोप करणं पडलं महागात; 'त्या' अभिनेत्रीवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

Suryakumar Yadav defamation suit Khushi Mukharji 100 crore: भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्यावर केलेले आरोप अभिनेत्री खुशी मुखर्जीला महागात पडले आहेत.
suryakumar yadav
suryakumar yadavgoogle
Published On

भारतीय क्रिकेट टीमचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबद्दल बॉलिवूड अभिनेत्रीने एक वक्तव्य केलं होतं. दरम्यान सूर्यकुमारवर केलेल्या विधानामुळे अभिनेत्री खुशी मुखर्जी अडचणीत आल्याचं दिसून येतंय. तिची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण आता कायदेशीर लढाईत पोहोचलंय. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी यांनी खुशी मुखर्जी यांच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केलाय.

खुशी मुखर्जीने एका मुलाखती दरम्यान सूर्यकुमार यादव तिला वारंवार मेसेज करत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं होतं. या विधानावरून सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. दरम्यान यावर क्रिकेटच्या चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिली होती.

suryakumar yadav
ICC Ranking: दो भाई, दोनों तबाही! ICC वनडे रँकिंग पाहून रोहितच्या चाहत्यांना धडकी भरेल

पोलिसांकडे तक्रार दाखल

मुंबईतील रहिवासी फैजान अन्सारी यांनी गाझीपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. खुशी मुखर्जीचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूचं प्रतिमा मलिन झाली आहे, असं अन्सारी यांचं म्हणणं आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, अशी विधानं केवळ प्रसिद्धीसाठी केली जात होती.

अन्सारी यांनी सांगितलं की, तक्रार दाखल करण्यासाठी ते स्वतः मुंबईहून गाजीपूरला गेले होते. असे आरोप खेळाडूच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक इमेजवर परिणाम करतात आणि कोणत्याही परिस्थितीत असं करणं योग्य नाही.

suryakumar yadav
Virat Kohli: जगात भारी, विराट कोहली! ODI रँकिंगमध्ये पुन्हा नंबर १, रोहित शर्माची जागा घेतली

कडक कारवाईची मागणी

माध्यमांशी बोलताना फैजान अन्सारी म्हणाले की, या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. खुशी मुखर्जीविरुद्ध गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल केला पाहिजे. हा केवळ सूर्यकुमार यादवच्या प्रतिष्ठेचा प्रश्न नाही तर देशभरातील एका प्रतिष्ठित खेळाडूचा आहे.

suryakumar yadav
IND vs NZ: राजकोटच्या मैदानावर केएल राहुलचा जलवा, शतकानंतर खास सेलिब्रेशन; भारताचं न्यूझीलंडसमोर २८५ रन्सचं आव्हान

फैजान अन्सारी यांनी स्पष्ट केलं की, त्यांनी खुशी मुखर्जीविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केलाय. त्यांनी असंही म्हटलंय की, जर खुशी मुखर्जीने तिचे दावे पुराव्यांसह सिद्ध केले तर ते सार्वजनिकरित्या माफी मागण्यास तयार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com