Maharashtra Live News Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक ३ मार्च २०२६, इराण-इस्त्राइल युद्ध, पाकिस्तान-अफगाणिस्तान हल्ला, महाराष्ट्रात अर्थसंकल्प अधिवेशन, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam TV marathi
Published On

शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्ष आग्रही असल्याचे पाहायला मिळालं. त्यात, संख्याबळ अधिक असल्याने शिवसेना आणि काँग्रेसच जास्त आग्रही होती. मात्र मविआकडून  राज्यसभेसाठी पुन्हा एकदा शरद पवार यांचे नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे.  

सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल

सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर दाखल झालेत. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ते राज्यसभेच्या एका जागेसाठी चर्चा करणार आहेत.

ग्रहणाचे वेध सुरू असतानाच गर्भवती मातेने तोडले, अंधश्रद्धेचे ग्रहण

ग्रहण काळामध्ये गर्भवतींना पाळायला लावणाऱ्या अनिष्ट रुढींना छेद देण्यासाठी सांगलीमध्ये अंनिसने "सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण" हा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत एका महिलेने ग्रहण काळामध्ये भाजी चिरली, त्यानंतर फळे खाऊन, जेवणही केले. ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलेने भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात. या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भ्रामक कल्पनेला सांगलीच्या चांदणी प्रफुल थोरात या गर्भवती महिलेने आज छेद दिला. ग्रहणाचे वेध सुरू झाल्यानंतर चांदणी थोरात या गरोदर महिलेने भाजी चिरली, कात्रीने कागद कापले तसेच फळे कापून ती खाल्ली ही,सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण"या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Pune : पुण्यात होळीच्या कार्यक्रमात तरुणाला बेदम मारहाण

पुण्यातील कल्याणी नगर येथे HOLI SHIT 3.0 X RANGOTSAV या कार्यक्रमात overcrowding मुळे लोक भिंतीवरून आत बाहेर जात येत होते. या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. क्षमता कमी असताना अतिरिक्त तिकिटांच वाटप करण्यात आल्याचा आरोप आहे. रिफंडवरून देखील वाद झाल्याची माहिती हाती आली आहे.

Mumbai : पोर्तुगाल महिलेची छेडछाड; दोन्ही आरोपी अटकेत

मुंबईतील आग्रीपाडा परिसरात एका पोर्तुगाल विदेशी महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

आखाती देशातील युद्ध वाढल्यास हापूस आंबा निर्यातीला बसणार फटका

आखाती देशातील युध्दजन्य परिस्थिती वाढल्यास याचा मोठा फटका कोकणातील हापूस आंब्याला बसू शकतो. सद्या हापूस आंब्याची आवक कमी असली तरी पुढील १० दिवसानंतर हापूस आंबा आवक वाढणार आहे. आखाती देशातील दुबई , ओमान , बेहरीन, कतार, इराण या देशात हापूस आंब्याची निर्यात होत असते. दिवसाला साधारण ६० ते ७० टन हापूस हवाई आणि जलवाहतूकीतून आखाती देशात जातो. मात्र सुरू असलेले युध्द जास्त दिवस राहिल्यास हापूस आंबा निर्यातीला मोठा फटका बसू शकतो.

Bhandara : भंडाऱ्यात भीषण अपघात, एकाचा मृत्यू 

भंडाऱ्याच्या खरबीत भरधाव कारनं दुचाकीस्वारांना चिरडलं

एकाचा मृत्यू...दोन गंभीर...

संतप्त गावकऱ्यांनी केली कारची तोडफोड

 पंतप्रधान मोदींचा ४८ तासांत आखाती देशातील प्रमुखांशी संपर्क  

महाराष्ट्र एटीएसने मुंबईत संशयित आयसिस ऑनलाइन प्रचार साहित्य संदर्भात टाकली धाड

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयसिस) च्या ऑनलाइन प्रचाराशी संबंधित संशयित संबंधांच्या प्रकरणाच्या संदर्भात मुंबईतील तीन ठिकाणी छापे टाकले.

belapur : धुळवडीनिमित्त ब्रास बँडवर थिरकल्या आमदार मंदा म्हात्रे

हिंदू सणांपैकी प्रमुख असलेला हा होळीचा सण दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. बेलापूर आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील महिलांसह होळी आणि धुलीवंदनाचा सण त्यांच्या निवासस्थानी येथे साजरा केला जात आहे. धुळवडीनिमित्त आमदार मंदा म्हात्रे ब्रास बँडवर थिरकताना दिसल्या. आगरी-कोळी गाण्यांच्या ठेक्यावर सर्वांचेच पाय थिरकताना दिसले.

अमेरिका व इराण युद्धामुळे सोलापूर जिल्ह्यातील निर्यातक्षम केळी उत्पादकांना मोठा फटका

अमेरिका व इराण युद्धामुळे केळीचे कंटेनर परत यायला सुरुवात

जवळपास 1200 कंटेनर केळी करमाळ्याच्या कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून

आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातक्षम केळीचे जहाजावरील कंटेनर माघारी यायला सुरुवात झाली आहे

या युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या करमाळा तालुक्यातील कोल्ड स्टोअरेजमध्ये अंदाजे 7 ते 8 कोटींची केळी पडून

कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवरील होळी कार्यक्रमात अपघात; लाईटचा गर्डर कोसळून 15-16 जण जखमी

कोरेगाव पार्क-मुंढवा रोड परिसरातील रॉयल फॉर्म येथे सुरू असलेल्या होळी निमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेला लाईटचा गर्डर अचानक कोसळल्याने सुमारे 15 ते 16 तरुण-तरुणी जखमी झाले.

यवतमाळच्या गोटमार यात्रेत अनेक जण गंभीर जखमी

सर्वत्र धुलीवंदनला रंगाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला जात असतानाच यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील गदाची बोरी येथे मात्र एक अंगावर काटा आणणारी परंपरा आजही जोपासली जाताहेत. या गावात रंगाची नव्हे तर रक्ताची होळी खेळली जाते. यामध्ये दोन गट एकमेकांवर रक्तस्त्राव होईपर्यंतच दगडफेक करतात. ही परंपरा मागील अनेक वर्षांपासून आजही कायम आहे. रंगाऐवजी चक्क दगडांनी होळी खेळली जातेय. गेल्या 50 ते 60 वर्षांपासून सुरू असलेली ही गोटमारची प्रथा पाहण्यासाठी विदर्भातून नागरिक मोठ्या संख्येने गदाजी बोरी येथे गर्दी करतात. विशेष म्हणजे या गावात मडक्यात धुनी पेटवून ती एखाद्या शवयात्रे प्रमाणे गावातून फिरवली जाते.

युद्धामुळे सोलापूर जिल्ह्यातील 400 टनपेक्षा अधिकचे द्राक्षे कोल्ड स्टोरेज मध्ये पडून राहिल्याने शेतकरी चिंतेत

सध्या जगावर तिसऱ्या महायुद्धाचे संकट असून अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू आहे.या युद्धाचा मोठा फटका जिल्ह्यातील बळीराजाला बसत असून शेकडो टन द्राक्षे हे कोल्ड स्टोरेज मध्ये पडून आहेत.रशिया युरोपला निर्यात होणारी ही द्राक्ष संकटात सापडले असून शेतकऱ्यांच मोठ नुकसान होत आहे. सुवेझ कालव्याच्या मार्गावर बंधन आल्याने कोल्ड स्टोरेज मध्ये माल पडून आहे.एक्सपोर्ट दर्जाचे द्राक्षे स्थानिक बाजारपेठेत कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर चौकात उड्डाण पुलावर अपघात

राजाराम पुलाकडून वडगाव कडे जाणाऱ्या एका चार चाकी गाडीचा अपघात झाला सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

बाणेर भागातील एक गाडी राजाराम पुलाकडून वडगावच्या दिशेने निघाली होती आनंदनगर च्या भादखेर चौकात ही गाडी अचानक उलटली या गाडीला एका दुचाकी स्वार तरुणीने धुंद पद्धतीने गाडी चालवत चार चाकी गाडीच्या पुढे गेली.

अचानक आलेल्या या दुचाकीमुळे कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि अचानक गाडी उलटली.परिणामी अपघात झाला या अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन पुलावर वाहनांच्या रांगा लागल्या. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अधिक चौकशी सिंहगड पोलीस करत आहेत.

दुबईत अडकलेल्या यवतमाळच्या नागरिकांसाठी विशेष विमान

दुबईत अडकलेल्या यवतमाळच्या नागरिकांसाठी विशेष विमान, राज्य सरकाराच्या मदतीनंतर दुबई एमिरेट्स एयर लाईनची विशेष विमानाने येणार बंगलोरला

दुबईत अडकलेल्या सगळ्यांच्या संपर्कात होते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुबई वरून बंगलोर येणाऱ्या विमानात एकुण 399 प्रवाशी,अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्याने विमान सेवा बंद पडल्यामुळे यवतमासह अनेक जिल्ह्यातील नागरिक दुबईत अडकले होते

यवतमाळ येथील राजीव निलावार,सतीश बनगिनवार,राजु लोहाना,शाम पाटील,निखील जिरापूरे जलाल गिलानी आदींचा समावेश

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या मांडवा दिगर तांड्यावर बंजारा बांधवांनी केली धुळवण साजरी

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या मांडवा दिगर येथील बंजारा तांड्यावर बंजारा समाज बांधवांनी पारंपारिक पद्धतीने धुळवणीचा उत्साह साजरा केला. बंजारा समाज बांधवांच्या या उत्साहात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही उपस्थिती लावत सहभाग घेतला. याप्रसंगी बंजारा समाज बांधवांनी पारंपारिक नृत्य व रंगांची उधळण करून धुळवणीचा उत्साह साजरा केला.

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यासोबत साजरी केली धुळवड

भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज भोकरदन येथील आपल्या निवासस्थानी शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांसोबत रंगाची उधळण करत मोठ्या आनंदात आणि उत्साहात धुलीवंदन साजरा केलाय.हातामध्ये स्वतः सिलेंडर घेत दानवे यांनी धुलिवंदना निमित्त आलेल्या कार्यकर्त्यावर रंगाच्या फवाऱ्याचा मारा केला.यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान रावसाहेब दानवे यांच्यासाठी कार्यकर्त्याने एक भन्नाट गाणं गायलं त्यावेळी स्वतः रावसाहेब दानवे यांनी त्याच्यासोबत खंजिरी वाजवत गाण्याचा मनमुराद आनंद घेतला.

जळगावमधील शेकडो मंदिरे बंद

ग्रहण काळात मंदिरे बंद ठेवण्याची पौराणिक काळापासून परंपरा आहे,या परंपरे नुसार आज जळगाव मधील शेकडो मंदिरे बंद ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे

आज ग्रस्तोदित चंद्रग्रहण लागत आहे,सकाळी सहा वाजून वीस मिनिटांच्या पासून ग्रहनाचे वेध लागले असून,वेध लागल्या पासून म्हणजेच सकाळी सहा वीस मिनिट पासून जळगाव मधील शेकडो मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे

या काळात देवाच्या आराधना करण्या बरोबर दानधर्म करता येत असला,तरी मूर्ती पूजा वर्ज्य मानल्या जात असल्याने,या काळात मंदिरे बंद ठेवण्यात येत असल्याची पौराणिक काळापासून परंपरा असल्याचं मंदिराच्या पुजाऱ्यांनी म्हटल आहे

Maharashtra Live News Update : भाजपचा अंबरनाथमध्ये रंगोत्सव; तरुणाई रंगात न्हाऊन निघाली

भारतीय जनता पार्टी तर्फे अंबरनाथ शहरात उत्साहात रंगोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागांतील तरुणाईने या रंगोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. रंगांची उधळण, आनंदाचा जल्लोष आणि डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई यामुळे परिसर अक्षरशः रंगमय झाला होता.या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी केले होते. त्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या रंगोत्सवाला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

त,पुण्याच्या सिहगड,भोर परिसरात सुमारे ४० हेक्टर क्षेत्र जळून खाक.वनविभागाची माहिती

गेल्या काही दिवसांपासून डोंगर रांगांना लागत असलेल्या वनव्यात,पुण्याच्या सिहगड,भोर परिसरात सुमारे ४० हेक्टर क्षेत्र जळून खाक.वनविभागाची माहिती

कालही सिंहगड भोर परिसरात वणवा पेटल्याच्या घटना..

सतत डोंगर रांगांना लागणाऱ्या ह्या वणव्यामुळं वनसंपत्तीची आणि वन्यप्राण्यांची मोठी हानी झालीय.

तालुक्याच्या पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील डोंगररांगांवरील वनसमृद्धी नष्ट झाल्यानंतर वणव्यांचे लोन आता पूर्वेकडील डोंगरांवर सुरू झाले आहे..

शिवसेनेचे मुख्य नेता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा अत्यंत साधेपणाने धुळवडीचा उत्सव संपन्न केला. ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी सेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच रंग उधळून साधे पानाचे उत्सव साजरा केला.

बुलढाणा जिल्ह्यातील राहेरीत ग्रामस्थांचे आमरण उपोषण; प्रशासनाचे दुर्लक्ष, आंदोलनाचा सहावा दिवस...

बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी येथे ग्रामस्थांचे साखळी उपोषण आज सहाव्या दिवशीही सुरू असून, जिल्हा प्रशासनाकडून पूर्णतः दुर्लक्ष केल्या जात आहे.

सिंदखेडराजा तहसीलदारांवर कारवाई करावी, रेती उपसा प्रकरणाची चौकशी करावी, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल ग्राह्य धरावा तसेच आतापर्यंत झालेल्या रेती उत्खननाचे पंचसमक्ष मोजमाप करावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.

दिलगिरी व्यक्त करत दुबई प्रशासनाने प्रत्येक प्रवाशाला 26000 चे गिफ्ट दिले

दुबईमध्ये अडकलेला कोल्हापूरच्या हुपरीतील 25 जणांचा ग्रुप आज सकाळी सुखरूप कोल्हापूरमध्ये पोहोचला आहे... आखाती देशांमधून उड्डाण घेतलेल्या दोन विमानांपैकी एका विमानांमध्ये कोल्हापूरचा हा ग्रुप होता.... हा ग्रुप दुबई मध्ये ज्या ठिकाणी राहिला होता, त्या हॉटेलच्या आजूबाजूला हल्ले करण्यात आले होते.... जीव मुठीत घेऊन हा सगळा ग्रुप दुबई मधून अबुधाबीला बाय रोड बाहेर पडला... आणि सुदैवाने भारतात येणाऱ्या दोन विमाना पैकी एका विमानाचे बुकिंग या ग्रुपने केलं होतं.... घरामध्ये पोहोचल्या पोहोचल्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं... या सर्व ग्रुपने दुबईमध्ये होणारे हल्ले तिथल्या विमानतळाची अवस्था आणि आकाशातून हल्ले झाल्यानंतर धुराचे लोट यांनी पाहिलं आहेत

होळी निमित्त कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी पोलिसांकडून वाहन चालकांची तपासणी

कल्याण डोंबिवली होळी उत्साहाने साजरी केली जात आहे. नागरीकांमध्ये उत्साह आहे. उत्साहाच्या भरात कोणताही अनूचित प्रकार घड नये यासाठी पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्ते चौकात तपासणी सुरु आहे. वाहन चालकांची तपासणी केली जात आहे. वाहतूक पोलिस आणि शहर पोलिसांची संयुक्त कारवाई सुरु आहे.

इराण–इस्रायल युद्धाचा परिणाम कोल्हापुरातील ड्रायफ्रुट्स बाजारावर

मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि इराण– इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी उलथापालथ होत आहे. त्याचे पडसाद आता कोल्हापूरच्या ड्रायफ्रुट्स बाजारावर उमटू लागले आहेत. कोल्हापूर मध्ये मोठ्या प्रमाणात खजूर, पिस्ता, बदाम, अक्रोड यांसारखे ड्रायफ्रुट्स मध्यपूर्वेतील देशांतून आयात केले जातात. युद्धजन्य परिस्थितीमुळे समुद्री वाहतूक, विमा खर्च आणि आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी ड्रायफ्रुट्सच्या दरात १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

प्रत्यक्ष ग्रहण काळात शनीचौथरा दर्शन राहणार बंद

आज चंद्रग्रहण असल्याने प्रत्यक्ष ग्रहण काळात श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे चौथरा दर्शन बंद असणार आहे... शनिशिंगणापूर येथील शनी देवाची शिळा उघड्यावर असल्याने चौथऱ्याच्या खालून देवाचे दर्शन घेता येते त्यामुळे केवळ चौथऱ्यावरील दर्शन बंद असणार आहे...इतर ठिकाणी ग्रहण काळात मंदिर दर्शनासाठी बंद असते मात्र शनिशिंगणापूर येथे मंदिर नाही...दरम्यान ग्रहण काळात आपल्या दैवतांची उपासना करून ग्रंथ वाचन करावे असं शनिशिंगणापूर देवस्थान येथील पुजारी गणेश कुलकर्णी यांनी म्हंटले आहे.

मुंबईच्या जुहूतील जेव्हीपीडी मैदानावर रंगांची उधळण सुरू झाली 

बॉलिवूड डीजेच्या ठेक्यावर तरुणाई होळीच्या रंगात न्हाऊन नाचताना दिसत आहे.उत्साह, जल्लोष आणि सुरक्षेच्या कडेकोट बंदोबस्तात हा सोहळा रंगत आहे.या विशेष होळी सेलिब्रेशनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे मेट्रोचा तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रोचे स्वयंचलित गेट्स

पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवरील तिकीट तपासणीत मोठा बदल केला आहे.आता मेट्रो स्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना असणारे गेट्स आधीपासून बंद असतील आणि तुम्ही तिकीट स्कॅन केल्यावरच ते उघडतील.

नंदुरबार जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार असतानाही पालकमंत्री आणू शकत नाही काँग्रेसचे माजी मंत्री के.सी. पाडवी यांचे टीका

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावरून राजकारण तापले आहे. जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पालकमंत्री पद रिक्त असल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठकही होऊ शकलेली नाही. यावरून काँग्रेसचे माजी मंत्री के.सी.पाडवी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. नंदुरबार हा केंद्र सरकारने आकांक्षी जिल्हा म्हणून घोषित केलेला असताना देखील विकास कामांना गती मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार असतानाही पालकमंत्री नेमणूक न होणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. पालकमंत्री नसल्याने बजेटमधील तरतूद आणि नियोजन प्रक्रिया ठप्प झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मी पालकमंत्री असताना आकांक्षी जिल्ह्यासाठी ७० कोटी रुपयांचा वेगळा निधी दिला होता, असे सांगत सध्याचे मंत्री हे केवळ मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करणारे असल्याची टीकाही त्यांनी केली. पालकमंत्री नसताना आदिवासी भागाच्या विकासाचे काय होणार, असा सवाल करत सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्र एटीएसने मुंबईत संशयित आयसिस ऑनलाइन प्रचार साहित्य संदर्भात टाकली धाड

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयसिस) च्या ऑनलाइन प्रचाराशी संबंधित संशयित संबंधांच्या प्रकरणाच्या संदर्भात मुंबईतील तीन ठिकाणी छापे टाकले

सूत्रांच्या माहितीनुसार, अतिरेकी सामग्रीचा ऑनलाइन प्रसार आणि वापर करणाऱ्या व्यक्तींबद्दल विशिष्ट गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर कुर्ला आणि शिवाजी नगर, गोवंडी भागात समन्वित छापे टाकण्यात आले

ही कारवाई संशयित कट्टरतावाद आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आयसिसशी संबंधित प्रचार सामग्रीच्या प्रसाराच्या संदर्भात शुरु चौकशीचा एक भाग आहे.

मिळाल्या माहितीनुसार आन लाईन क्रियाकलाप, संप्रेषण चॅनेल आणि संभाव्य भरती प्रयत्नांच्या पुराव्यासाठी मोबाइल फोन आणि लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जात आहे

आरोपींचे कथित सहभागाचे स्वरूप आणि व्याप्ती निश्चित करण्यासाठी शोध दरम्यान एटीएस तर्फे अनेक व्यक्तींची चौकशी करण्यात आल्याची माहिती

ISIS शी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र ATS कडून मुंबईत तीन ठिकाणी छापे

मुंबईतील कुर्ला आणि गोवंडी परिसरात महाराष्ट्र ATS च्या पथकाकडून तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी

ISIS शी कथित संबंध असलेल्या प्रकरणाच्या तपासात ही कारवाई करण्यात येत आहे.

या छापेमारीदरम्यान काही व्यक्तींची चौकशी देखील सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

वेंगुर्ल्यात गाव होळीसह धुळवडीचा उत्साह शिगेला

वेंगुर्ल्यात धुळवडीचा उत्साह शिगेला पोचला असून शहरातून होळीची मिरवणूक काढत गुलाल उधळत धुळवड साजरी करण्यात येत आहे. वेंगुर्ल्यात पोफळीच्या झाडाची गाव होळी घातली जाते. होळी तोडल्यानंतर तिची शहरातून मिरवणूक काढण्यात येते.. यावेळी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत होळी नाचविली जाते.. यावेळी बच्चे कंपनीसह अबालवृद्ध या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होतात. वेंगुर्ल्यात आज मोठ्या धुमधडाक्यात होळीसह धुळवड साजरी करण्यात येत असून होळीचा उत्साह शिगेला पोचला आहे.

विचित्र अपघातात तरुण ठार,तर तरुणी गंभीर जखमी

होळीच्या दिवशी नवी मुंबईत पाम बीच रोडवर एका दुचाकीच्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून मागे बसलेल्या तरुणीला गंभीर दुखापत झाली असून ती डी वाय पाटील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.रात्री ३ वाजता पाम बीचवर दुचाकीवरून एक तरुण आणि तरुणी जात असताना अचानक एका गाडीने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार ठोकर दिल्याने दोघेही सत्याच्या मध्ये पडले त्यात मागून येणाऱ्या एका कार ने त्यांना उडविले त्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने दोघानाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले,त्यावेळी डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले असून तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे.अपघातातील फरार दोन्ही कार चालकांचा शोध पोलीस घेत आहेत.

वेंगुर्ल्यात गाव होळीसह धुळवडीचा उत्साह शिगेला

वेंगुर्ल्यात धुळवडीचा उत्साह शिगेला पोचला असून शहरातून होळीची मिरवणूक काढत गुलाल उधळत धुळवड साजरी करण्यात येत आहे. वेंगुर्ल्यात पोफळीच्या झाडाची गाव होळी घातली जाते. होळी तोडल्यानंतर तिची शहरातून मिरवणूक काढण्यात येते.. यावेळी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत होळी नाचविली जाते.. यावेळी बच्चे कंपनीसह अबालवृद्ध या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होतात. वेंगुर्ल्यात आज मोठ्या धुमधडाक्यात होळीसह धुळवड साजरी करण्यात येत असून होळीचा उत्साह शिगेला पोचला आहे.

Kokan: कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह

कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा देखील शिमगोत्सवात सहभाग

आपल्या पाली गावातील शिमगोत्सवात ढोल वाजवण्याच मोह आवरला नाही

गळ्यात ढोल घालून सामंतानी वाजवला ढोल

श्री लक्ष्मी पल्लीनाथ देवस्थान शिमगोत्सवात उदय सामंत यांच ढोलवादन

Latur: मुरुड परिसरात अवैध दारू विक्री; महिलांचा आक्रमक पवित्रा

लातूरच्या मुरुड परिसरात अवैध दारू विक्रीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे,स्थानिक नागरिकांकडून सातत्याने अवैध दारू विक्री बाबत आवाज उठवला जात आहे, मात्र दारू विक्री बंद होत नसल्याने मुरुड पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी निदर्शने आंदोलन केले आहे. परिसरातील दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी महिलांमधून होते आहे. वारंवार तक्रार आणि निवेदन देऊन ही, दखल घेतली जात नसल्याने महिलांनी आक्रमक पवित्रा घेतलाच पाहायला मिळाला .

Pune: पुण्याच्या वाघोलीमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

पुण्याच्या वाघोली मध्ये लहान रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी.

वाघोली, येथे होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. काल पार पडलेल्या होलिकादहनानंतर आज रंगपंचमीच्या निमित्ताने परिसरात आनंदाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण रंगांची उधळण करत, गुलाल उधळत आणि एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद लुटताना दिसत आहेत. ढोल-ताशांच्या गजरात, रंगांची धुळण उडवत सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, एकोप्याचा आणि प्रेमाचा संदेश देणारा सण. या पवित्र अग्नीमध्ये सर्व नकारात्मकता दहन होवो आणि येणारा काळ आनंद, समृद्धी आणि रंगांनी भरून जावो, अशीच सर्वांची भावन आहे.

Dharashiv: धाराशिवमध्ये कालाकेंद्रात पुन्हा राडा

धाराशिवमध्ये कालाकेंद्रात पुन्हा राडा

चोराखळी कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा ; सहा जणांची घुसखोरी

डोक्याला पिस्तूल तर गळ्याला सुरा लावून 9 लाख 51 हजाराचा मुद्देमाल केला लंपास

येरामाळा पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल 6 ते 7 जण केले आरोपी, तपास सुरू

फिर्यादी च्या तक्रारी वरून सचिन पवार सह पाच अज्ञात आरोपी व महादेव घुले वर संशय

घटनेत कला केंद्र चालक निर्मला जाधव ,रेखा शिंदे, शिवम उर्फ गळ्या गंगावणे या तिघांना मारहाण तिघेजण जखमी

घटनेने धाराशिव जिल्यात पुन्हा एकदा खळबळ

Shirdi: खग्रास चंद्रग्रहणामुळे आज साडेतीन तास साईदर्शन राहणार बंद

आज खग्रास चंद्रगहण असल्याने ग्रहणकाळात साईदर्शन बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आलाय.. खग्रास चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू होवून 6 वाजून 48 मिनिटांनी संपणार आहे.. या काळात भाविकांसाठी साईदर्शन बंद ठेवण्यात येणार असुन साई समाधीवर दुर्वा, तुळशीपत्र यांचे आच्छादन ठेवून मंत्रोच्चार सुरू राहणार आहेत.. ग्रहण कालावधी संपल्यानंतर साईबाबांचे मंगलस्नान पार पडेल आणि धुपारती झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन पूर्ववत सुरू होईल..

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील वर्षभर राज्यातील दौरे रद्द करणार

मराठा समाजाला दिलेलं आरक्षण चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही असा दिलासा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी दिले आहे. दरम्यान स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यासाठी आपण राज्यातील सर्व दौरे रद्द करणार आहोत असे जरांगे यांनी जाहीर केले.

करमाळा तालुक्यातील वरकुटे येथील मराठा मेळाव्यात त्यांनी भावना व्यक्त केल्या

चार-पाच दिवसानंतर राज्यातील सर्व दौरे एक वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे माझी संपत्ती समाज आहे आयुष्यात मी एक रुपया कमावला नाही माझं कुटुंब डावावर लागलं कोणी कधी मला मारून टाकतील माझ्या कुटुंबाला त्रास देतील तरी मी मागे हटत नाही रात्र दिवस समाजासाठी बाहेर फिरतो आहे मला धमक्या येत आहेत हे करणार ते करणार कोणीतरी म्हणाला भंडारा लावून मारून टाकतो गरिबाचं काम करतोय म्हणून मला मारायचा ठरलंय का मी मरायला भीत नाही माझी कधी पण तयारी आहे माझा समाज पण सज्ज आहे असं प्रति आव्हान जरांगे यांनी धमक्या देणाऱ्यांना दिलेला आहे

युद्धाची धग नवी मुंबईतील जेएनपीए बंदरापर्यंत पोहचली, एपीएमसी बाजारातही परिणाम

आखाती देशांकडे निर्यातीसाठी तयार ठेवलेले कांदा, केळी, द्राक्षे यांसह फळ फळावळांचे सुमारे 1000 कंटेनर जेएनपीटी बंदरात पडून असून,कृषी मालाच्या आयात निर्यातीवर थेट 60% परिणाम झाल्याची माहिती आहे तरयुद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी वाहतूक क्षेत्रात मोठी अनिश्चितता दिसून येत आहे.शिपिंग कंपन्यांनाचाही आखाती देशात माल पाठवण्यास नकार असल्याने काही जहाजांना माघारी फिरण्याचे दिले आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

जेएनपीएतून दर आठवड्याला जवळपास 54 मालवाहू जहाजांची ये जा होत असते.

युद्धाचा संपूर्ण परिणाम स्पष्ट होण्यासाठी आणखीन काही दिवस लागण्याची शक्यता आहे,यावेळी याचा परिणाम आशियातील सर्वात मोठी असलेली बाजारपेठ नवी मुंबईतील वाशी मधील एपीएमसी बाजारावर झाल्याचे व्यापारी सांगत आहेत..

जळगावात छत्रपती संभाजी नगर महामार्गावर गांजाची तक्सरी करणाऱ्या वाहनावर कारवाई

जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद वाहनातून स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत लाखोंचा गांजा जप्त करण्यात आला असून दोन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत . ३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते . फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने तपासणीसाठी घेतले आहेत .पहूर पोलीस यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे .

नांदेडमध्ये होळी निमित्त आयोजित महामूर्ख कवी संमेलनाला उत्स्फूर्द प्रतिसाद..

होळी सणा निमित्त सोमवारी नांदेड शहरात महामूर्ख कवि संमेलन पार पडले. अनेक कविनी यात सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे उदघाट्न तृतीय पंथीयाच्या हस्ते गर्दभराजाला पुष्पहार टाकून करण्यात आले. धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून मागील 26 वर्षा पासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येतं . द्विअर्थी कवि संमेलनाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Sangli: सांगलीत ग्रहणामुळे धुळवडच्या कोंबड्या विक्रीला फटका..

धुळवड निमित्ताने मटण आणि कोंबड्यांवर ताव मारला जातो,मात्र धुळवडच्या दिवशीच ग्रहण आल्याने त्याचा फटका कोंबड्या विक्रीला बसल्याचं पाहायला मिळतंय.. धूळवड निमित्ताने सांगलीत ठीक-ठिकाणी देशी कोंबड्याला मोठी मागणी असते, कोंबड्यांचे दर देखील मटणापेक्षा अधिक आहेत... पाचशे रुपये पासून तब्बल 1500 पर्यंत कोंबड्यांचा दर आहे.. मात्र धुळडच्या दिवशीच ग्रहण आल्याने कोंबड्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने, त्याचा फटका कोंबड्या विक्रीवर झाल्याचे पाहायला मिळतंय.. विटा या ठिकाणी चौका चौकात कोंबड्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात विक्रेते दाखल झाले होते, मात्र कोंबड्या खरेदीला ग्राहकांनी पाठ केली आहे.

Nagpur: नागपूरातील नंदनवन परिसरात होळीचा मोठा उत्साह

नागपूरातील नंदनवन परिसरात होळीचा मोठा उत्साह....

गुलाबाच्या फुलांची होळी खेळत नागपुरकरांनी होळी सणाचा घेतला आनंद

रासायनिक रंग न वापरता पर्यावरण पुरक होळीसाठी फुलांची पाकळ्या करून पर्यावरण पूरक हॉलिबद्दल जनजागृती

फुलांच्या होळीत महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचाही सहभाग

रासायनिक रंग न वापरण्याचं आवाहन अमलात आणून फुलांच्या पाकळ्यांची उधळण...

फुलांची होळी खेळत सर्वत्र गुलाबाच्या पाकळ्यांची चादर, फुलांचा नैसर्गिक रंगात होळी खेळत पाण्याची बचतीचाहाही दिला संदेश...

Kokan: कोकणात शिंमगोत्सवाची धूम

कोकणात शिंमगोत्सवाची धूम

मोठ्या संख्येने कोकणवासीय शिंमगोत्सवासाठी कोकणात दाखल

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देवभैरी च्या शिमगोत्सवाला सुरुवात

ग्रामदेवतेच्या भेटीसाठी आसपासच्या गावातील पालख्या श्री देवभैरी मंदिरात

रत्नागिरीच्या ग्रामदैवत श्रीदेवभैरीचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले मनोभावे दर्शन

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची कर्जमाफीसाठी आंदोलनाची हाक

मराठा आरक्षण आंदोलना नंतर आता जरांगे पाटील शेतकरी कर्जमाफीसाठी आणि हमीभावासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.‌ तशी घोषणा जरांगे यांनी करमाळ्यात बोलताना केली आहे.

शेतकर्यांनी आंदोलनासाठी एकत्र आले पाहिजे. तुमचे कर्ज ठेवत नाही. शेतीमालाला आणि दूधाला हमीभाव कसा मिळत नाही ते मी पहातो. पीक विमा सुध्दा मिळवून देतो. तुम्ही फक्त चल म्हटलं की माझा सोबत आलं पाहिजे. शेतकर्यांनी आंदोलनासाठी सज्ज राहावे असे आवाहन ही जरांगे यांनी केले आहे.

Trimbkeshwar: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मारहाण प्रकरणात पोलीसांची सुमोटो कारवाई

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मारहाण प्रकरणात पोलीसांची सुमोटो कारवाई

मारहाण करणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुरक्षारक्षकांविरोधात गुन्हा दाखल

पप्पू आचारी, तुकाराम बुरुंगे यांच्यासह अन्य 4 सुरक्षारक्षांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

एका भाविकाला सुरक्षारक्षकांच्या टोळक्याने कपडे फाडत लाथा बुक्क्यांनी केली होती मारहाण

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंदिर संस्थानच्या मनमानी कारभाराची प्रांताधिकाऱ्यांमार्फतही सुरू करण्यात आलीय चौकशी

एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात पोलीसांकडून 11 आरोपींना अटक

एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात पोलीसांकडून 11 आरोपींना अटक ..

मालक आलोक चौधरी फरार ...

पोलीसांच्या तीन पथकांकडून अलोक चौधरीचा शोध सुरु ..

या प्रकरणात आतापर्यंत 19 कामगारांचं मृत्यू झाला असून 22 कामगार गंभीर जखमी आहे. त्यात 12 जखमींची प्रकुर्ती गंभीर आहे.

Sangli: सांगली महापालिकेची पहिलीच महासभा ठरली वादळी

सांगली महापालिकेची पहिल्याच महासभा प्रचंड वादळी ठरली. पहिल्याच पार पडलेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.. शहरातल्या स्वच्छता, पाणी पुरवठा, उद्यानांची दुरवस्था, ड्रेनेज योजना, आणि एलइडी प्रकल्पासह प्रशासकीय काळातील कारभारावरून अधिकारयांना चांगलेचं धारेवर धरले. तर प्रशासकीय काळात महासभा घेऊन करण्यात आलेले ठराव रद्द करण्याची जोरदार मागणी देखील महासभेत करण्यात आली.. यावर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी याबाबत पडताळणी करून बेकायदेशीर असणारे ठराव विखंडित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल असा आश्वासन या सभेमध्ये दिले.तसेच एलइडी बाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला.

धुलीवंदना निमित्त रंग गुलाल घेण्याकरिता बाजारपेठ सजली

धुलीवंदना निमित्त आज बाजारपेठेत रंग घेण्याकरिता गर्दी फुललेली आहे बच्चे कंपनी तथा पुरुष व महिलांनी सुद्धा रंग घेण्याकरिता गर्दी केलेली आहे महागाई जरी वाढलेली असेल तरी धुलीवंदन या सणावर काही फरक पडलेला नाही रंग गुलाल घेणाऱ्याकरिता बाजारपेठेत गर्दी फुलून दिसली आहे.

मेळघाटात नवनीत राणा यांची अनोखी होळी,आदिवासी महिलांसोबतआदिवासी नृत्यावर ठेका धरत साजरा केला सण

अमरावतीच्या माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा यांनी मेळघाट दौऱ्यादरम्यान आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली.यावेळी त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी नृत्य करत सणाचा आनंद लुटला.मेळघाटातील गावांमध्ये होळी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आदिवासी महिलांनी पारंपरिक गोंड आणि कोरकू नृत्य सादर केले. त्यामध्ये माजी खासदार नवनीत राणा यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत आदिवासी बांधवासोबत आदिवासी नृत्यावर ठेका धरला.

सोलापुरात रमाई सेवाभावी संस्थेतर्फे 'रमाईची लेक' पुरस्काराने विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव

रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीचे औचित्य साधून रमाई सेवाभावी संस्थेतर्फे 'रमाईची लेक' पुरस्कार सोहळा 2026 पार पडला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.रमाई सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रशासन, पोलीस दल, शिक्षण, सामाजिक कार्य, उद्योग, कला, क्रीडा राजकीय आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘रमाईची लेक’ या पुरस्काराने सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आलं.या पुरस्कार सोहळ्यामुळे समाजात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव झाला असून, अनेकांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम ठरला आहे.

पर्यटनासाठी दुबईत गेलेले उमरगा येथील ज्येष्ठ नागरिकांची भारतात परतण्यासाठी केंद्र सरकारला विनंती

जवळचे पैसे संपल्याने राहण्याची आणि खाण्याची अडचण होत असून आम्हाला भारत सरकारने भारतात येण्याची सोय करावी ज्येष्ठ नागरिकांची विनंती

धाराशिवच्या उमरगा येथील दोन जोडपे युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकले दुबईत

केंद्र सरकारने विशेष विमानांची सोय करुन आम्हाला भारतात आणवे, उमरग्यातील अडकलेले पर्यटक दळगडे व माशाळकर कुटुंबीयांची मागणी

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आदर्श विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवानंद दळगडे आणि शिवानंद माशाळकर हे आपल्या पत्नीसह पर्यटनासाठी दुबईला गेले असताना तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकून पडले आहेत

पर्यटनासाठी गेलेले ज्येष्ठ नागरिक 1 मार्चला परतणार होते भारतात मात्र दुबईतून विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली

Maharashtra Live News Update : धूलीवंदन निमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवेच्या वेळेत बदल

आज सकाळी ६ ते दुपारी ३ या वेळेत पुणे मेट्रो राहणार बंद

दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरू राहील

दुपारी तीन नंतर प्रवाशांना मेट्रो ने प्रवास करता येणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com