pkl 2023 Saam tv news
Sports

Pro Kabaddi News: यू मुंबाचा विजयरथ अखेर थांबला! अर्जुनच्या सुपर १० च्या बळावर जयपुरचा मोठ्या फरकाने विजय

U Mumba vs Jaipur Pink Panthers: गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघाने घरच्या मैदानावर यू मुंबाचा दारुण पराभव केला आहे. स्पर्धेतील ५८ व्या सामन्यात जयपूरवर यू मुंबाला ४१-३१ ने धूळ चारली.

Ankush Dhavre

U Mumba vs Jaipur Pink Panthers:

गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघाने घरच्या मैदानावर यू मुंबाचा दारुण पराभव केला आहे. स्पर्धेतील ५८ व्या सामन्यात जयपूरवर यू मुंबाला ४१-३१ ने धूळ चारली. स्पर्धेतील सहा सामने जिंकत जयपूरचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. तर यू मुंबाचा संघ पाचव्या स्थानी कायम आहे.

या सामन्यात जयपूर पिंक पँथर्स संघाकडून अर्जुन देशवाल चमकला. त्याने सर्वाधिक १७ गुणांची कमाई केली. तर बचाव करताना अंकुश राठीने हाय फाय पूर्ण केलं. तर दुसरीकडे यू मुंबाकडून गुमान सिंगने सर्वाधिक १३ गुणांची कमाई केली. यू मुंबाचे बचावपटू पूर्णपणे फ्लॉप ठरले. त्यामुळे यू मुंबाला या सामन्यात आघाडी घेता आली नाही. तर जयपूर पिंक पँथर्सने राहुल चौधरीला ७ खेळाडूंमध्ये स्थान दिलं नाही. (Latest sports updates)

या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने यू मुंबावर २२-१३ ची आघाडी घेतली. इथून यू मुंबाला कमबॅक करण्याची संधी होती. मात्र अर्जुन देशवालची चढाई आणि जयपूरचा आक्रमक बचाव यामुळे यू मुंबाचा संघ ऑल आऊट झाला. सामन्याच्या आठव्या मिनिटाला यू मुंबाचा संघ ऑल आऊट झाला. यू मुंबाकडून गुमान सिंगने आपलं सुपर १० पूर्ण केलं. मात्र त्याला संघाकडून हवी तशी साथ मिळाली नाही.

दुसऱ्या हाल्फच्या सुरुवातीलाच अर्जुनने आपलं सुपर १० पूर्ण केलं. सामन्यातील २८ व्या मिनिटाला यू मुंबाचा संघ दुसऱ्यांदा ऑल आऊट झाला. जयपूरकडे १३ गुणांची आघाडी होती. इथून यू मुंबासाठी कमबॅक करणं कठीण होतं. शेवटी मुंबईला १० गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह यू मुंबाच्या विजयाच्या मालिकेला पूर्णविराम मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT