नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं.
या मालिकेत भारतीय संघाचे गोलंदाज सुपरहिट ठरले. मात्र फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. मुख्य बाब म्हणजे वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये सुपरहिट ठरलेला शुभमन गिल कसोटीत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
शुभमन गिल केवळ वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतो असा टॅग लावला जात आहे. टी -२० आणि वनडे क्रिकेटमध्ये तो चमकला, मात्र कसोटीत त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर गेला असताना शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला. मात्र हा प्रयोग कुठेतरी फसलाय असं दिसून येत आहे. कारण तो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना आपली छाप सोडू शकलेला नाही. या मालिकेतील २ सामन्यातील ४ डावात त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही. (Latest sports updates)
पुजाराने कसली कंबर..
गेल्या काही वर्षांपासून चेतेश्वर पुजारा भारतीय संघाची भिंत म्हणून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. मात्र फॉर्ममध्ये नसल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आलं होतं. त्याच्याऐवजी शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. मात्र त्याला ही जबाबदारी हाताळता आलेली नाही. सतत फ्लॉप ठरत असल्याने त्याला संघातील स्थान गमवाव लागू शकतं.
भारतीय संघाबाहेर असलेला पुजारा सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत सौराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या संघाकडून खेळताना त्याने झारखंड संघाविरुद्धच्या सामन्यात १६२ धावांची खेळी केली आहे. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार मारले. पुजारा फॉर्ममध्ये परतल्याने शुभमन गिलच्या अडचणी वाढू शकतात. येत्या काही दिवसात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या मालिकेसाठी अनुभवी पुजाराला संघात स्थान दिलं जाऊ शकतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.