PKL Season 10 Record: PKL इतिहासातील दुसऱ्या महागड्या खेळाडूचा मोठा कारनामा! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Pro Kabaddi Season 10: पुणेरी पलटन संघाचा स्टार बचावपटू मोहम्मदरेजा शादलूने प्रो कबड्डीच्या १० व्या हंगामात मोठा कारनामा केला आहे.
Mohammadreza Chiyaneh Shadloui
Mohammadreza Chiyaneh Shadlouisaam tv news
Published On

Mohammadreza Chiyaneh Shadloui Record:

पुणेरी पलटन संघाचा स्टार बचावपटू मोहम्मदरेजा शादलूने प्रो कबड्डीच्या १० व्या हंगामात मोठा कारनामा केला आहे. त्याने स्पर्धेतील ५१ व्या सामन्यात मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. मोहम्मदरेजा शादलू या लीग स्पर्धेत बचाव करताना सर्वात जलद १०० गुणांची कमाई करणारा बचावपटू ठरला आहे. त्याने या रेकॉर्डमध्ये मंजित चिल्लरला मागे सोडलं आहे.

प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या १० व्या हंगामात तो पुणेरी पलटन संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या संघाचं प्रतिनिधित्व करताना त्याने तेलुगु टायटन्सविरुद्धच्या सामन्यात हा कारनामा करुन दाखवला आहे. त्याने या सामन्यात बचाव करताना एकुण ४ गुणांची कमाई केली. यादरम्यान त्याने रॉबिन चौधरीला बाद करताच हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. त्याने हा कारनामा आपल्या ५२ व्या सामन्यात करुन दाखवला आहे. (Latest sports updates)

Mohammadreza Chiyaneh Shadloui
IND vs SA Match Timing: भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्याची वेळ बदलली! किती वाजता सुरु होणार सामना?

मोहम्मदरेजा शादलूच्या प्रो कबड्डी स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत २२१ गुणांची कमाई केली आहे.यादरम्यान त्याने बचाव करताना २०२ तर चढाई करताना १९ गुणांची कमाई केली आहे.

यापूर्वी हा रेकॉर्ड भारतीय खेळाडू मंजित चिल्लरच्या नावावर होता. त्याने ६१ सामन्यांमध्ये २०० गुणांचा पल्ला गाठला होता. यासह ६२ सामन्यांमध्ये २०० गुणांचा पल्ला गाठणारा विशाल भारद्वाज या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

Mohammadreza Chiyaneh Shadloui
IND vs SA: पहिल्या कसोटीत सुपरफ्लॉप,तरीही रोहित या खेळाडूला देणार संघात स्थान!स्वत:केला मोठा खुलासा

या खेळाडूंच्या नावे आहे सर्वाधिक गुणांची नोंद..

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत २०० गुणांची कमाई करणारा तो २६ वा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी फज़ल अत्राचली (४४९), मनजीत चिल्लर (३९१), सुरजीत सिंग (३७४), गिरीश मारुती एर्नाक (३६०), संदीप नरवाल (३६०), नितेश कुमार (३३९), रविंदर पहल (३३९), संदीप ढुल (३११), परवेश भैंसवाल (३०४)

सुनील कुमार (३०१), विशाल भारद्वाज (२९९), महेंदर सिंह (२८०), सुरेंदर नाडा (२७८), मोहित चिल्लर (२७७), रण सिंह (२७४), अमित हूडा (२६८), धर्मराज चेरलाथन (२६१), जीवा कुमार (२५७), सुरिंदर सिंह (२५५), सौरभ नांदर (२२५) , सुमित सांगवान (२२४), रवि कुमार (२१८), जोगिंदर नरवाल (२१०), विशाल माने (२०३) आणि अबोज़ार मिघानी (२०३) यांनी हा कारनामा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com